महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दाभोलकर हत्या प्रकरण : 'महाविकास आघाडी सरकारमधील मोठ्या नेत्याने प्रकरण दाबले'

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून सात वर्षापूर्वी 20 ऑगस्ट 2013 रोजी झाला होता. या हत्येमुळे पुरोगामी चळवळीचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले होते.

By

Published : Aug 21, 2020, 3:11 PM IST

Updated : Aug 21, 2020, 3:16 PM IST

mumbai
वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकर

मुंबई- डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला ७ वर्ष पूर्ण झाली.आरोपींचा आणि त्या कटाच्या मास्टरमाईंडचा अजूनही शोध लागलेला नाही, तो लागणारही नाही. राज्यात सेक्युलर सरकार आलंय अस म्हणतात. पण,आम्हाला तरी शंका आहे की, या सेक्युलर सरकारमधील मोठी व्यक्ती आहे, ज्याने हे प्रकरण त्याचकाळी दाबले होते, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

पुरोगामी हा व्यक्ती शोधतील का ?

समस्त पुरोगामी मंडळींना माझे सांगणे आहे की, ही लढाई न्यायालयीन नसून राजकीय आहे. तेव्हा त्यापासून तुम्हाला पळता येणार नाही. इथल्या संत परंपरेविरुद्ध वैदिक परंपरेचे हे राजकीय युद्ध आहे, असेही आंबेडकर म्हणाले आहेत.

दरम्यान, विवेकवादी कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून सात वर्षापूर्वी 20 ऑगस्ट 2013 रोजी झाला होता. या हत्येमुळे पुरोगामी चळवळीचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले होते.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाच्या तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप करण्यात आहे. यावर सरकारविरोधात तीव्र रोष पुरोगामी, डाव्या, आंबेडकरी चळवळीत निर्माण झाला आहे.

Last Updated : Aug 21, 2020, 3:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details