मुंबई- कोरोनाशी लढण्याची क्षमता लोकांमध्ये वाढत आहे. यामुळे सरकारने सर्व व्यवहार 50 टक्के सुरू करावे. सार्वजनिक वाहतूक ही सुरू व्हावी. 10 ऑगस्ट पर्यत असं न झाल्यास 12 ऑगस्टला वंचित बहुजन आघाडी तर्फे राज्यभर एस टी आणि बस डेपो समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला आहे.
50 टक्के सार्वजनिक व्यवस्था चालू करा, अन्यथा 12 ऑगस्टला थाळीनाद : वंचित बहुजन आघाडीचा इशारा - वंचित बहुजन आघाडी बातमी
कोरोनाचा मुकाबला करण्यात यशस्वी झाले आहेत. तर 5 टक्के लोकांना उपचार देऊन नियंत्रणात आणता येत नाही. कोरोना रोखण्यासाठी जे आरोग्य विषयक सुरक्षिततेचे नियम आहेत, त्याचे काटेकोर पालन करत सर्व व्यवहार चालू करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी केली आहे.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक लोकांचे रोजगार गेले आहेत. ते बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे त्यांनी जगायचे कसे असा प्रश्न त्यांना सतावत आहे. अनेक कामगार अजूनही बेरोजगार होण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे राज्यातील एसटी सेवेसह स्थानिक सार्वजनिक वाहतूक आणि सर्व प्रकारची दुकाने लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा १० ऑगस्टनंतर आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य शासनाला पुण्यातून दोन दिवसांपूर्वी दिला होता. मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे पत्रकार परिषद घेऊन पुन्हा सरकारला इशारा देण्यात आला आहे.
गेल्या चार महिन्यांपासून ऑफिस, दुकाने, हॉटेल, मार्केट्स इत्यादी गोष्टीमुळे लोकांचा आपापसांतील सम्पर्क कमी झाला आहे. महाराष्ट्रातील तज्ञ मंडळींनी कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास केल्यानंतर कोरोनाला लढण्याची क्षमता 80 टक्के लोकांमधे आहे. महाराष्ट्रातील 15 टक्के लोक वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देऊन कोरोनाचा मुकाबला करण्यात यशस्वी झाले आहेत. तर 5 टक्के लोकाना उपचार देऊन नियंत्रणामध्ये आणता येत नाही. कोरोना रोखण्यासाठी जे आरोग्य विषयक सुरक्षिततेचे नियम आहेत त्याचे काटेकोर पालन करत सर्व व्यवहार चालू करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी केली आहे.
सरकारने या सर्व सेवा निदान 50 टक्के तरी चालू कराव्यात. सरकारने असे नाही केले तर वंचित बहुजन आघाडी 12 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर एसटी व बसडेपो समोर थाली नाद आंदोलन करेल, असा इशारा आम्ही देत आहोत असे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष ऍड धनंजय वंजारी यांनी सांगितले.