महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Vaccination : कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस देण्यात देशात महाराष्ट्र प्रथम

राज्यात या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ६ कोटी २७ लाखांवर गेली आहे. देशभरात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे. २१ ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी ११ लाख ४ हजार ४६४ नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यंतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती.

By

Published : Sep 4, 2021, 10:08 PM IST

मुंबई -कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज शनिवार ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत ११ लाख ९१ हजार ९२१ नागरिकांना लस देण्यात आली आहे. राज्यात या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ६ कोटी २७ लाखांवर गेली आहे. देशभरात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे.

आजपर्यंतचा विक्रम

२१ ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी ११ लाख ४ हजार ४६४ नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यंतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. आज (दि. ४ सप्टेंबर) झालेल्या लसीकरण सत्रांमध्ये सायंकाळी सात वाजेपर्यंत ११ लाख ९१ हजार ९२१ नागरिकांचे लसीकरण झाले आहे, रात्री उशिरापर्यंत या आकडेवारीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. लसीकरण कार्यक्रमातील हा आजपर्यंतचा विक्रम असून आरोग्य यंत्रणेतील सर्व घटकांच्या परिश्रमाचे हे फलित आहे, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

एकूण ६ कोटी १५ लाख १६ हजार १३७ लसींचे डोस दिले

महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण ६ कोटी १५ लाख १६ हजार १३७ लसींचे डोस देण्यात आले असून त्यात दुसऱ्या लसीचा डोस देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या आज जारी केलेल्या एकत्रित अहवालानुसार महाराष्ट्रात १ कोटी ७१ लाख जणांना दुसऱ्या लसींचे डोस देण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details