मुंबई -गेल्या वर्षभरापासून जनता ज्या लसीची आतुरतेने वाट पाहत होती, त्या कोरोना लसीकरणाला अखेर सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात खासगी आणि शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. दरम्यान मुंबईच्या कुपर रुग्णालयात लस दाखल होताच कर्मचाऱ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवून या क्षणाचे स्वागत केले.
मुंबईच्या कुपर रुग्णालयामध्ये टाळ्यांच्या गजरात लसीकरणाला सुरुवात - कोरोना लसीकरण लेटेस्ट न्यूज
गेल्या वर्षभरापासून जनता ज्या लसीची आतुरतेने वाट पाहत होती, त्या कोरोना लसीकरणाला अखेर सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात खासगी आणि शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. दरम्यान मुंबईच्या कुपर रुग्णालयात लस दाखल होताच कर्मचाऱ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवून या क्षणाचे स्वागत केले.
आज मुंबईमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील कूपर रुग्णालयात लसीकरण करण्याची व्यवस्था करण्यात आली. आज सकाळी कोरोना लस कूपर रुग्णालयात दाखल झाली. त्यासोबतच लसीकरणसाठी आवश्यक असलेले वैद्यकीय कर्मचारी देखील रुग्णालयात दाखल झाले, या सर्वांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. कोरोना लस देण्यात येणाऱ्या व्यक्तींना शुक्रवारी सायंकाळपर्यंत संदेश पाठवण्याचे काम सुरू होते. ज्या व्यक्तींना संदेश प्राप्त झाले आहे, अशाच व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार आहे. या संदेशामध्ये कोणत्या रुग्णालयामध्ये लसीकरण करण्यात येणार आहे, किती तारखेला लसीकरण करण्यात येणार आहे, लसीकरणाची वेळ अशा सर्व बाबींची माहिती देण्यात आली आहे. संदेश मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीने लसीकरण केंद्रावर येऊन लसीकरण करून घ्यायचे आहे.