मुंबई - लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा आहे. मोबाइल तिकिटींग अॅप युटीएस (UTS Mobile app) सामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. कोरोना काळात रेल्वे प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर युटीएस अॅपवरून (UTS Mobile app) तिकिट बुकिंग बंद करण्यात आले होते. युटीएस अॅप हे महाराष्ट्र सरकारच्या लसीकरण प्रमाणपत्र पोर्टलशी जोडले गेले आहे.
अखेर युटीएस अॅप (UTS Mobile app) हे महाराष्ट्र सरकारच्या युनिर्व्हसल पास पोर्टलशी (Universal pass of Maharashtra govt) जोडण्यात आले आहे. त्यामुळे युटीएस अॅपमधून तिकिट घेताना संबंधित प्रवाशाचे लसीकरण झाले असल्याची खातरजमा होणार आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी दिली आहे.