महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Electric Vehicles : इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सवय बनणे आवश्यक -आदित्य ठाकरे - इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आदित्य ठाकरे

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेला 'मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्ष' हे क्रांतिकारक पाऊल असून या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी मदत होईल, असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही केवळ मोहीम न राहता ती सवय बनणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे

By

Published : Feb 24, 2022, 12:09 PM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेला 'मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्ष' हे क्रांतिकारक पाऊल असून या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी मदत होईल, असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. (Electric Vehicles) इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही केवळ मोहीम न राहता ती सवय बनणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक -

'मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्ष'चा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना, वातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक उपाययोजना करून शाश्वत विकासाकडे राज्य शासनाची वाटचाल सुरू आहे. याच अनुषंगाने राज्याने आपले सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. या अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी सुरूवातीला सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्यात आले. आता शासकीय पातळीवर इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वातावरणीय बदलांमुळे होणाऱ्या दुष्परिणाम

यापुढे वैयक्तिक पातळीवर या वाहनांचा वापर वाढावा यासाठी चार्जिंग स्थानके वाढविण्यासारख्या पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतुकीअंतर्गत मुंबईत बेस्टच्या ताफ्यात सध्या असलेल्या ३८६ बसेसमध्ये लवकरच वाढ होऊन २०२७ पूर्वी १०० टक्के बसेस इलेक्ट्रिक असतील यासाठी नियोजन करण्यात येत आहे. वातावरणीय बदलांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा उल्लेख करून ठाकरे यांनी कार्बन न्यूट्रलच्या दिशेने जाताना संबंधित सर्वच विभागांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

प्रदूषण रोखण्यात आघाडीचे राज्य बनू -

राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, वातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबविण्याकरिता शक्य त्या सर्व उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून हवा आणि ध्वनीचे प्रदूषण थांबविणे तसेच इंधनाचा वापर कमी करणे यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविणे ही त्यापैकीच एक उपाययोजना आहे.

मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्ट्रिक वाहन कक्षामार्फत प्रयत्न करण्यात येणार असून या उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. मुंबईसह राज्यात लवकरच मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक वाहने प्रत्यक्ष धावू लागतील आणि वाहनांद्वारे होणारे प्रदूषण रोखण्यात आपण आघाडीचे राज्य बनू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा -राज्यात महाविकास आघाडीचा आक्रमक पवित्रा; मुंबईत मंत्र्यांकडून निदर्शने

ABOUT THE AUTHOR

...view details