महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ramdas Athawale न्यायालयीन लढाईत शिंदे गटाचा विजय होणार, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केली आशा - केंद्रीय मंत्री रामदास आठवले विधिमंडळ भेट

केंद्रीय मंत्री रामदास आठवले Minister Ramdas Athawale visited Vidhanbhavan यांनी आज विधिमंडळ परिसरात भेट दिली. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन Maharashtra Monsoon session सुरू असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत Chief Minister and Deputy Chief Minister त्यांची चर्चा झाली नाही. तरीही, महायुतीमध्ये Grand Alliance रिपाइं पक्षहीसोबत आहे. त्यामुळे रिपाइंला मंत्रीमंडळ RPI Cabinet विस्तारात स्थान मिळावे, अशी मागणी रामदास आठवले Union Minister Ramdas Athawale  यांनी केली आहे. तसेच, शिंदे गट विरुद्ध शिवसेना Shinde group vs Shiv Sena यांच्यातील न्यायालयीन वादावरही त्यांनी भाष्य केले.

Ramdas Athawale
Ramdas Athawale

By

Published : Aug 24, 2022, 7:17 PM IST

मुंबई -केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले Union Minister Ramdas Athawale visited Vidhanbhavan यांनी आज विधिमंडळ परिसरात भेट दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून ते राजकीय परिस्थिती आणि मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा करणार होते. मात्र, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन Maharashtra Monsoon session सुरू असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत Chief Minister and Deputy Chief Minister त्यांची चर्चा झाली नाही. तरीही, महायुतीमध्ये Grand Alliance रिपाइं पक्षहीसोबत आहे. त्यामुळे रिपाइंला मंत्रीमंडळ RPI Cabinet विस्तारात स्थान मिळावे, अशी मागणी रामदास आठवले Union Minister Ramdas Athawale यांनी केली आहे. तसेच, शिंदे गट विरुद्ध शिवसेना Shinde group vs Shiv Sena यांच्यातील न्यायालयीन वादावरही त्यांनी भाष्य केले.


गॅलरीत बसून पाहिले कामकाज :मुंबई महापालिकेच्या वार्डंसंदर्भात बदलेल्या निर्णयावरील विधेयकावर विधानसभेत चर्चा सुरु होती. ती चर्चा मी गॅलरीत बसून पाहत होतो. मला ती ऐकायची होती, त्यासाठी मी आलो होतो, असे रामदास आठवले यांनी म्हटले. तसेच, शिवसेनेतील बंडानंतर पडलेल्या दोन गटांचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. न्यायालयाने खंडपीठ स्थापन करण्याचेही निर्देश दिले आहेत. त्यामुळे, यासंदर्भातील सुनावणी आणखीनच लांबली असून शिंदे गटाचा यात विजय होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.


धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला भेटणार? :दुसरीकडे शिंदे विरुद्ध शिवसेना यांच्यातील पक्षीय वाद हा निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. त्यामुळे, सध्या शिवसेनेला दोन्ही लढाया लढाव्या लागत आहेत. मात्र, या दोन्ही लढाया शिंदे गटच जिंकेल, कारण खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच शिवसेना असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. तसेच धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटालाच मिळेल, असे सांगताना त्यांनी स्वत:चचे उदाहरण दिले. आमच्या रिपाइं पक्षात काही मतभेद निर्माण झाले होते. त्यावेळी एका बाजुला मी आणि दुसऱ्या बाजुला जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई हे होते. या वादात आमच उगवता सूर्य हे चिन्ह होत ते गवईंना मिळालं होते. मात्र, माझ्यासोबत १०० टक्के पक्ष होता. तरीही ते चिन्ह त्यांना मिळाले होते. म्हणूनच, २/३ मेजोरिटी असलेल्या शिंदेंनाच धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल, असे आठवलेंनी सांगितले. तसेच आगामी नगरपालिका, महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीत असलेल्या रिपाइं पक्षाला काही जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणीही आठवलेंनी केली.


'हा उत्तर प्रदेश किंवा बिहार नाही?' :आजच सकाळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये जो राडा झाला. त्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, दादागिरी करुन राजकारण चालत नाही. असे वागायला हा उत्तर प्रदेश किंवा बिहार नाही, हे महाराष्ट्र आहे. नितीमत्तेवर येथील राजकारण चालत असते. विधानसभेत दादागिरी करुन राजकारण चालत नसते. पायऱ्यावर दररोज बसणे योग्य नाही. जर पायऱ्यावर बसायचे असेल तर विधानसभेत येऊ नका. पायऱ्यावर बसून रस्ता अडवायचा असल्यास, इतरांची गैरसोय करता कामा नये, असे सांगत विरोधकांतील तीन पक्ष म्हणतात शिंदे सरकार पाडा, म्हणून सत्ताधारी करतात राडा, अशी छोटेखानी कविताही त्यांनी केली.

हेही वाचा -Maharashtra Monsoon Session आमदार एकमेकांवर धावले धक्काबुक्कीही केली मिटकरींचा शिवीगाळीचा आरोप

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details