महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विशेष : रेल्वेच्या जीटीबीएस सेवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड, 350 जीटीबीएस केंद्रांवर डिजीटल मंदी

बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी मुंबई आणि उपनगरात रेल्वेकडून जनसाधारण तिकीट बुकिंग सेवक (जीटीबीएस) नियुक्त केली होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून युटीएस ॲप आणि एटीव्हीएम मशीनच्या वाढत्या वापरामुळे 350 पेक्षा जास्त जीटीबीएस सेवकांवर पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळी आहे.

gtbs_central_train_ticket
gtbs_central_train_ticket

By

Published : Apr 3, 2021, 6:39 PM IST

मुंबई - बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी मुंबई आणि उपनगरात रेल्वेकडून जनसाधारण तिकीट बुकिंग सेवक (जीटीबीएस) नियुक्त केली होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून युटीएस ॲप आणि एटीव्हीएम मशीनच्या वाढत्या वापरामुळे 350 पेक्षा जास्त जीटीबीएस सेवकांवर पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळी आहे. आता कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानानंतर जीटीबीएस केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे.

काय आहे जीटीबीएस ?

रेल्वेकडे स्वतंत्र तिकीट देण्याची यंत्रणा आहे. मात्र, रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी आणि बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी खासगी दुकानांत लोकलची तिकिट विक्री करण्याची परवानगी दिली होती. मध्य रेल्वेकडून 500 पेक्षा जास्त उपनगरीय मार्गावर जनसाधारण तिकीट बुकिंग सेवक (जीटीबीएस) नियुक्त केले आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट खिडक्यांवर रांग लागण्याची अडचण दूर झालेली होती. तसेच रेल्वे प्रवाशांच्या वेळेची बचत सुद्धा मोठ्या प्रमाणात होत होती. जीटीबीएस सेवक प्रत्येक तिकिटवर एक रुपया कमिशन घेत होते. नंतर हे कमिशन दोन रुपये करण्यात आले होते. तरी सुद्धा रेल्वे स्थानकांबाहेर जीटीबीएस केंद्राला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळत होता.

रेल्वेच्या जीटीबीएस सेवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
युटीएस अ‌ॅप जोमात जेटीबीएस कोमात -
रेल्वे प्रशासनाने 2017 पासून युटीएस अॅपची सुरुवात केली होती. युटीएस अ‌ॅप आल्यामुळे दिवसेंदिवस डिजीटल तिकीट खरेदी वाढली आहे. आज रेल्वेच्या युटीएस अ‌ॅपची युजर्स संख्या 10 लाखांच्या घरात पोहचली आहे. रेल्वे मार्गावरील एकूण प्रवाशांपैकी 12.70 टक्के प्रवासी युटीएस अ‌ॅप वापरतात. युटीएस अ‌ॅपद्वारे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना पाच टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे युटीएस अ‌ॅप वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जीटीबीएस सेवकांच्या व्यवसायावर त्यांचा परिणाम दिसून आलेला आहे. पूर्वी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 750 जीटीबीएस केंद्र होते. त्यांची संख्या आज 350 च्या घरात पोहचली आहे.
जीटीबीएस केंद्र बंद करण्याची वेळ -
जीटीबीएस सेवक अनिल गुप्ता यांनी ईटीव्ही भारताला सांगितले की, यूटीएस ॲप आणि एटीव्हीएम मशीनच्या वाढता वापरामुळे जीटीबीएसमार्फत तिकीट खरेदी संख्या 80 टक्यांनी कमी झालेली आहे. पूर्वी जीटीबीएस केंद्रावरून दररोज 400 तिकीट विक्री होत होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून यूटीएस ॲप आणि एटीव्हीएम मशीन आल्याने मोठ्या प्रमाणात जीटीबीएस केंद्रावरून होणारी तिकीट विक्री कमी झालेली आहे. आता त्यात कोरोनामुळे लोकल प्रवासावर वेळेची मर्यादा घातल्याने आज 30 ते 40 तिकीट विक्री होत आहे. त्यामुळे जीटीबीएस केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे.
देखभाल खर्च परवडत नाही -
वेलजी मोना किराणा स्टोअरच्या गीता गुप्ता यांनी ईटीव्ही भारताला सांगितले की, आज जीटीबीएस केंद्रांवर डिजिटल मंदी आली आहे. दररोज 10 ते 20 तिकीट विक्री होत आहे. त्यामुळे लागणारा तिकीट प्रिंटरसाठी लागणारा मेंटेनन्स खर्च आणि दुकानाचे भाडे सुद्धा निघत नाही. रेल्वेने एकीकडे बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी ही योजना सुरू केली होती. मात्र, दुसरीकडे त्यांनी रेल्वे स्थानकावर एटीव्हीएम मशीन सुरू करून आमचा रोजगार हिरावला आहे. आज कोरोना सारख्या संकटकाळात रेल्वेचा जीटीबीएस सेवकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details