महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्‍बाल कासकरला एनसीबीकडून अटक - इक्‍बाल कासकर

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला मुंबई एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. इक्बाल कासकर याला मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने आज ताब्यात घेतलं आहे. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात प्रोडक्शन वारंट वर इक्बाल कासकरची कस्टडी घेतली आहे.

iqbal kaskar arrested by mumbai ncb
iqbal kaskar arrested by mumbai ncb

By

Published : Jun 23, 2021, 4:21 PM IST

मुंबई - अमली पदार्थ तस्करी प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्‍बाल कासकर यास ठाणे तुरुंगातून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून अटक करण्यात आलेली आहे. जम्मू-काश्मीर येथून मुंबई शहरात चरस या अमली पदार्थाची तस्करी करण्याच्या संदर्भात काही दिवसांपूर्वी अमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली होती . त्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून इक्‍बाल कासकर यास या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेली आहे.

मुंबई शहरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीतच्या विरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून कारवाई केली जात असताना जम्मू-काश्मीर व पंजाबमधून मुंबई शहरामध्ये चरस या अमली पदार्थाची तस्करी करण्याच्या संदर्भात एनसीबीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्‍बाल कासकर यास ठाणे तुरुंगातून अटक केली आहे

जम्मू काश्मीर पंजाबमधून मुंबईत आले होते 25 किलो चरस -

काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये 25 किलो चरस हे आणण्यात आले होते. हा अमली पदार्थ जम्मू-काश्मीर व पंजाब या माध्यमातून मुंबईपर्यंत पोहोचला असल्याचे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपासात समोर आल्यानंतर यासंदर्भात ही कारवाई करण्यात आलेली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्‍बाल कासकर याच्याविरुद्ध मनी लाँड्रीग प्रकरणात गुन्हा नोंद आहे. याबरोबरच एका बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी दिल्याबद्दल इक्‍बाल कासकर यास यापूर्वी अटक करण्यात आलेली होती.


चिंकू पठाण आणि आरिफ भुजवाला यांच्या चौकशीतून खुलासा -

एनसीबीकडून काही महिन्यांपूर्वी मुंबईत अमली पदार्थांची निर्मिती व तस्करी करून त्याचे वितरण करण्याच्या संदर्भात चिकू पठाण याच्यासह आरिफ भुजवाला व इतर अमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आलेली होती. चिंकू पठाण हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा खास माणूस म्हणून ओळखला जात असला तरी तो इकबाल कासकर याच्या सतत संपर्कात असल्याचेही एनसीबीच्या तपासात समोर आलेले आहे. एनसीबीने यापूर्वी डोंगरी परिसरामध्ये विविध ठिकाणी छापा मारून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते. या बरोबरच काही शस्त्र व रोख रक्कम सुद्धा जप्त करण्यात आलेली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details