मुंबई- युतीच्या जागा वाटपाबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. यावर पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला मी, मुख्यमंत्री आणि अमितभाई ठरवू, त्यामुळे जागा वाटपाबद्दल कोण काय म्हणते याकडे फार लक्ष देण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. यावरून भाजप-शिवसेनेमध्ये जागा वाटप अद्याप झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मातोश्री येथे बहुजन विकास आघाडीचे आमदार विकास तरे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या वेळी ते बोलत होते.
अमितभाईंसह मुख्यमंत्र्यांशी बोलून विधानसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवू - उद्धव ठाकरे
युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला मी, मुख्यमंत्री आणि अमितभाई ठरवू, त्यामुळे जागा वाटपाबद्दल कोण काय म्हणते याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले. यावरून भाजप-शिवसेनेमध्ये जागा वाटप अद्याप झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे
आमचे कुठलेही टार्गेट नाही. आमच्याकडे कोणते वॉशिंग पॉवडरही नाही. शिवसेनेचे काम पाहता आमच्याकडे अनेकजण आकर्षित होत असल्याने हे पक्ष प्रवेश होत आहेत. चांगले काम करण्यासाठी शिवसेनेला साथ मिळत आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Last Updated : Aug 26, 2019, 8:14 AM IST