महाराष्ट्र

maharashtra

शिवसेना प्रवक्त्यांशी उद्धव ठाकरेंचा संवाद, विरोधकांवर तुटून पडण्याचे दिले आदेश

By

Published : Apr 29, 2022, 10:32 PM IST

गेल्या काही दिवसापासून महाविकासआघाडी सरकार, आणि खास करून शिवसेनेवर विरोधक राजकीय आरोपांच्या तोफा डागत आहेत. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप शिवसेनेच्या नेत्यांवर तसेच महाविकासआघाडी वर केले जात आहेत. विरोधकांच्या या आरोपाला तेवढ्यात आक्रमकतेने उत्तर देत विरोधकांवर तुटून पडा असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रवक्त्यांना दिले.

शिवसेना प्रवक्त्यांशी उद्धव ठाकरे यांनी आज संवाद साधला
शिवसेना प्रवक्त्यांशी उद्धव ठाकरे यांनी आज संवाद साधला

मुंबई - शिवसेना प्रवक्त्यांशी उद्धव ठाकरे यांनी आज संवाद साधला. याप्रसंगी खा. संजय राऊत, आनंद दुबे, खा. प्रियांका चतुर्वेदी, संजना घाडी, आ. अंबादास दानवे उपस्थित होते. तसेच विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान, किशोर कान्हेरे, शीतल म्हात्रे, डॉ. मनिषा कायंदे याही यावेळी उपस्थित होत्या. तसेच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, डॉ. शुभा राऊळ, प्रताप सरनाईक, सुनील प्रभू हे देखील यावेळी उपस्थित होते

गेल्या काही दिवसापासून महाविकासआघाडी सरकार, आणि खास करून शिवसेनेवर विरोधक राजकीय आरोपांच्या तोफा डागत आहेत. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप शिवसेनेच्या नेत्यांवर तसेच महाविकासआघाडी वर केले जात आहेत. विरोधकांच्या या आरोपाला तेवढ्यात आक्रमकतेने उत्तर देत विरोधकांवर तुटून पडा असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठकीतून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि राज ठाकरे शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजपाचे आणि राज ठाकरे यांचे हिंदुत्व कसे खोटा आहे हे लोकांसमोर उघडे पाडा असे आदेशही बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details