मुंबई: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण ह्या चिन्हा सोबतच शिवसेना नाव देखील गोठवल्यानंतर आता शिंदे व ठाकरे दोनही गटांकडून बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी पहिल्या फळीतील सर्व नेत्यांची महत्त्वाची बैठक मातोश्रीवर बोलावली होती. या बैठकीत चिन्हासंदर्भात व पुढची रणनीती काय असेल यावर खलबत झाल्याची माहिती शिवसेनेच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे. (Shivsena symbol). यावेळी उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संयमाची भूमिका ठेवायला सांगा, असा आदेश सर्व पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
Uddhav Thackeray: 'शिवसैनिकांना संयम ठेवायला सांगा', पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या सूचना
आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी पहिल्या फळीतील सर्व नेत्यांची महत्त्वाची बैठक मातोश्रीवर बोलावली होती. या बैठकीत चिन्हासंदर्भात व पुढची रणनीती काय असेल यावर खलबत झाल्याची माहिती शिवसेनेच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे. (Shivsena symbol). यावेळी उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संयमाची भूमिका ठेवायला सांगा, असा आदेश सर्व पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
भाजप विरोधात कुटुंबातील लोकांशी लढलो:उद्धव ठाकरे म्हणाले की, "बाळासाहेबांसारखे खणखणीत नाण आपल्याकडे आहे. मोदींच्या नावाची गरज असल्याचे सांगणाऱ्या बंडखोरांना आमच्यातून फुटल्यानंतर बाळासाहेबांच्या नावाची गरज काय? मी भाजप विरोधात कुटुंबातील लोकांशी लढलो. ही लढाई लढून 63 आमदार निवडून आणले. या सर्व घडामोडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. त्या सर्व कार्यकर्त्यांना संयमाची भूमिका ठेवायला सांगा", असा आदेश उद्धव ठाकरे यांनी या सर्व नेत्यांना दिला आहे.
शिंदेंनी हे खूप चुकीचं केलं:या बैठकी संदर्भात माहिती देताना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, "निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने आम्हाला तीन चिन्ह सुचवली आहेत. याच तीन चिन्ह बाबतची माहिती आज आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली. या तीन चिन्हांमध्ये उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल यांचा समावेश आहे. आता या चिन्हांवर काय निर्णय घ्यायचा याचा विचार उद्धव ठाकरे करतील. त्यानंतर तो जो निर्णय घेतील तो आम्ही निवडणूक आयोगाला कळवू. तर पक्षाच्या नावाच्या बाबतीत 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' 'शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे' ही तीन नावे आम्ही निवडणूक आयोगाला कळवली आहेत. पण हा निवडणुकीच्या चिन्हाचा मुद्दा ज्यांच्यामुळे उभा राहिलाय त्या शिंदे गटाला विचारले पाहीजे की ते निवडणुक लढवणार आहेत का? तुम्ही भाजपला विचारा की तुम्ही निवडणुक लढवणार आहात का? तुम्ही आमची निशाणी फ्रीज केली हे खूप चुकीचे केले आहे." अशी प्रतिक्रिया खासदारा सावंत यांनी दिली आहे.