मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला कोरोनाविरोधी लढण्यासाठी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी मुंबईतून नागरिकांना संबोधित केले. कोरोना हे एक युद्ध असून याचा एकत्रित सामना करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. घराबाहेर पडून सरकारी यंत्रणेवरील ताण वाढवू नका, असे ठाकरे म्हणाले.
#CORONA : 'हे संकट सर्वधर्मीयांवर' - uddhav thackeray press conference
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला कोरोनाविरोधी लढण्यासाठी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी मुंबईतून नागरिकांना संबोधित केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला कोरोनाविरोधी लढण्यासाठी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे
हे संकट सर्वधर्मीयांवर आहे. सर्वांनी एकजुटीने यावर मात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच ट्रेन आणि बसेसमधील गर्दी कमी करण्याची विनंती ठाकरे यांनी केलीय. सध्या सर्व प्रकारे सरकारी यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. याचसोबत सरकारी कर्मचाऱ्यांना दिवसाआड काम करण्याचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
Last Updated : Mar 19, 2020, 3:33 PM IST