मुंबई :महाराष्ट्रातील राजकारणात राजकीय घडामोडींना वेग ( Political Crisess in Maharastra ) आलेला असताना आज दिवसभर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Former CM Devendra Fadnavis ) यांच्या बंगल्यावर भाजपा नेत्यांची वर्दळ वाढली होती. याप्रसंगी उदयनराजे भोसले ( Udayan Raje Bhosale ) यांनीसुद्धा देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकार गठबंधन अनैसर्गिक असल्याचं सांगितलं आहे.
काय म्हणाले उदयनराजे : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला आहे. असे वारंवार सांगितले जाते. त्यावर बोलताना उदयनराजे म्हणाले की, याला भूकंप म्हणता येणार नाही कारण हे होणारच होतं. हे अगोदरच व्हायला पाहिजे होतं परंतु आता होत आहे. करण हे अनैसर्गिक गठबंधन होते. त्यावेळेला निवडून आलेल्या आमदारांना विचारात घेऊन जर सरकार स्थापन केल असते तर हे सरकार कधीच स्थापन झाले नसते. त्यावेळेला गठबंधन झाले ते फक्त सरकार स्थापन करण्यासाठी झाले होते. ते फार काळ टिकणारे नव्हते.