महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Uday Samant : लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल - उदय सामंत - uday samant katraj news

शिवसेनेतील बंडाळीला हिंसक वळण लागत आहे. उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाल्यानंतर उदय सामंत यांनी संयमी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच गर्भित इशाराही ( uday samant car attacked pune ) दिला आहे.

उदय सामंत
उदय सामंत

By

Published : Aug 3, 2022, 7:55 AM IST

Updated : Aug 3, 2022, 8:00 AM IST

मुंबई- राज्याचे माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर पुण्यातील कात्रज ( Uday samant car attacked pune ) येथे काही अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर सामंत यांनी प्रतिक्रिया देताना कोणीही एकनाथ शिंदे यांची साथ सोडून पळून जाणार ( attack on uday samant car ) नाही, असे सांगितले. , आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा सामंत यांनी हल्लेखोरांना आणि हल्ल्यामागील सूत्रधारांना ( uday samant katraj news ) दिला. त्यानंतर त्यांनी मध्यरात्री ट्विट करतही प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी मध्यरात्री ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की गद्दार म्हणता तरी शांत आहे...शिव्या घालता तरी शांत आहे..आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे..लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल.. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही..काळ ह्याला उत्तर आहे..अंत पाहू नका.. जय महाराष्ट्र

उदय सामंत यांचे ट्विट

उदय सामंत यांनी ही दिली प्रतिक्रिया-माझी कार ही कात्रज येथील सिग्नलला थांबली ( uday samant warn attackers ) होती. त्यावेळी माझ्या बाजूला एक गाडी थांबली आणि त्यातून दोन जण उतरले. त्यांच्या हातात बेसबॉलची बॅट होती तर दुसऱ्याने हाताला दगड बांधला होता. त्यांनी मला शिव्या देण्यास सुरूवात केली. दुसऱ्या बाजूने आलेल्या काहींच्या हातात सळ्या होत्या. या लोकांनी कार वर चढून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. असा भ्याड हल्ला करून आमचे लोक एकनाथ शिंदेंना सोडून पळून जातील असे वाटत असेल तर ते चुकीचे आहेत. उलट आजच्या हल्ल्याने आम्ही अधिकच जवळ आलो आहोत. असले भ्याड हल्ल्यांना घाबरणारा नाही, असे उदय सामंत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मी कोणावर टीका करत नाही म्हणून आमच्या सहनशीलतेचा अंत कोणी बघू नये. या हल्ल्याने दाखवून दिले की राज्यातील राजकारण किती हीन आणि खालच्या पातळीला चालले आहे.

मुख्यमंत्र्यांनी ही दिली प्रतिक्रिया-आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काय झाले याबाबत मला माहित नाही. पोलिसांना मी याबाबत सूचना दिल्या आहेत. कायदा सुव्यवस्था ठेवण्याचे काम हे सर्वांनी केले पाहिजे. कोणीही जर चिथावणीखोर भाषण देत असेल तर पोलीस कायदेशीर काम करतील, असे देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हिंगोली येथील शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले होते. त्यावर कोणी जर चिथावणीखोर भाषण केले असेल तर त्याच्यावर पोलीस कारवाई करतील. हे राज्य सामान्य नागरिकांचे आहे. त्यामुळे जर कोणी असे विधान करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे शिंदे म्हणाले. दरम्यान, वाहनावरील त्या हल्ल्यात कोणालाही दुखापत झालेली नाही. पुण्यातील कात्रज येथे सिग्नलवर सामंत यांची कार थांबली असताना रात्रीच्या सुमारास हा हल्ला झाला. याबाबत सामंत यांनी कोथरूड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा -Eknath Shinde : निवडून येण्यासाठी मला निवडणूक चिन्हाची गरज नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर बाण

Last Updated : Aug 3, 2022, 8:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details