मुंबई - मुंबईतील बदललेल्या प्रभाग रचनेवरून आरोप प्रत्यारोप ( Uday Samant comment on ward structure change ) सुरू झाले आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंना चिमटा काढल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे ( ward structure change eknath shinde ) यांचा विरोध झुगारून प्रभाग रचना बदलण्याचा निर्णय ( Uday samant on ward structure mumbai ) घेण्यात आला, असा दावा करत तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे यावेळी बोट दाखवले आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यामुळे, शिवसेना आणि शिंदे गट प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आमने - सामने येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -Salim Fruit : छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुटला 'या' तारखेपर्यंत एनआयए कोठडी
शिंदेंचा विरोध डावलून निर्णय -ऑक्टोबरमध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचना ( ward structure change in mumbai ) घेण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या निर्णयाला तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोध केला होता. तसेच, प्रभाग रचना तीन ऐवजी चार का करू नये, असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, प्रभाग रचनेत पारदर्शकता यावी अशी भूमिका शिंदे यांनी मांडली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारला बदललेल्या प्रभाग रचनेचा फायदा होईल, असे सांगत बहुमताने निर्णय घेण्यात आला. कोणताही निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्यानंतर तो मुख्य सचिवामार्फत संबंधित मंत्र्यांकडे पाठवला जातो. त्यानुसार तो तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आला होता. त्यामुळे, नगर विकास मंत्र्याने घेतलेला निर्णय आज मुख्यमंत्री झाल्यावर बदलला, असा काही जो गैरसमज पसरवला जात आहे तो चुकीचा असल्याचे उदय सामंत म्हणाले.