मुंबई- मुंबईत बोरिवली येथे आग लागण्याची तर चेंबूर भीम नगर येथे दरड कोसळण्याची घटना घडली आहे. आगीच्या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही तर दरड कोळण्याच्या घटनेत दोघे जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
दरड कोसळून दोघे गंभीर -चेंबूर येथील भीम नगर, आरसीएफ वाशी नाका येथे सकाळी 6 वाजता दरड कोसळली. डोंगरावर असलेल्या घरावर दरड कोसळली. या दुर्घटनेत दोघे जखमी झाले. अरविंद प्रजापती (वय 25 वर्षे), आशिष प्रजापती (वय 20 वर्षे), अशी जखमींची नावे असून त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.