मुंबई - पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीनंतर आता तेथील नागरिकांसमोर आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयातून दोन ट्रक औषध साठा कोल्हापूरला छत्रपती प्रमिलाराजे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
जे. जे. रुग्णालयातून 2 ट्रक औषधसाठा कोल्हापूरला रवाना - जे.जे. रुग्णालय अधिष्ठाता डॉ. चंदनवाले
या औषधात प्रामुख्याने जुलाब, कॉलरा आणि अतिसार आदी आजारांसाठी आय व्ही फ्लूइड्स म्हणजेच सलाईनसारखी औषधे आहेत. तसेच यात मेट्रोजिकल, अँटिबायोटिक औषधांचाही समावेश आहे.
जे.जे. रुग्णालयातून 2 ट्रक औषधसाठा कोल्हापूरला रवाना
या औषधात प्रामुख्याने जुलाब, कॉलरा आणि अतिसार आदी आजारांसाठी आय व्ही फ्लूइड्स म्हणजेच सलाईनसारखी औषधे आहेत. तसेच यात मेट्रोजिकल, अँटिबायोटिक औषधांचाही समावेश आहे.
तेथील परिस्थितीचा आढावा घेतल्यावर डॉक्टरांचे एक पथकही रवाना करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंदनवाले यांनी सांगितले. या पथकात मुख्यतः मेडिसिन, पीएसएम आणि मनोविकार तज्ञ आदी डॉक्टरांचा समावेश असेल.