मुंबई -माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई सायबर पोलिसांकडून ( Mumbai Cyber Police ) चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या बदल्यांचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी ( Transfer Posting Case ) देवेंद्र फडणवीसांचा जबाब नोंदवला ( Devendra Fadnavis Statement Recorded ) आहे. डीसीपी हेमराजसिंह राजपूत आणि एसीपी नितीन यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवला आहे. त्यानंतर मुंबई सहआयुक्त मिलिंद भारंबे ( JT CP milind Bharambe ) यांच्याकडे या संपूर्ण चौकशीची माहिती देण्यात आली आहे.
सायबर सेलने देवेंद्र फडणवीस यांना कोणते प्रश्न विचारले याबाबात अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रश्नांवर मुंबई पोलिसांचे समाधान होते की नाही, हे पहावे लागणार आहे. जर, फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरावर पोलीस समाधानी नसतील, तर त्यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यांनतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, सायबर सेलकडून मला या प्रकरणात सहआरोपी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे फडणवीस हे मुंबई उच्च न्यायालयात याबाबत सोमवारी याचिका दाखल करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.