महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

१५० शिक्षक बनले ‘कोविड’ प्रतिबंधक उपाययोजनांचे प्रशिक्षक

कोरोना विषाणूच्या संसर्गजन्‍य आजाराच्‍या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्‍या शाळांमधील विद्यार्थ्‍यांना सध्‍या ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्‍यात येत आहे. भविष्‍यात प्रत्‍यक्ष शाळा सुरू करण्‍याची बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाद्वारे याबाबत ‘सुनिश्चित कार्यपद्धती’ तयार करण्‍यात आली आहे.

Covid's prevention training
कोविड’ प्रतिबंध विषयक प्रशिक्षण

By

Published : Oct 22, 2020, 2:51 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गजन्‍य आजाराच्‍या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्‍या शाळांमधील विद्यार्थ्‍यांना सध्‍या ऑनलाइन पध्‍दतीने शिक्षण देण्‍यात येत आहे. भविष्‍यात प्रत्‍यक्ष शाळा सुरु करण्‍याची बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाद्वारे याबाबत ‘सुनिश्चित कार्यपद्धती’ तयार करण्‍यात आली आहे. या अनुषंगाने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या शाळांमध्‍ये येणाऱ्या विद्यार्थ्‍यांनी घ्‍यावयाची काळजी, शिक्षकांनी अमलात आणावयाच्‍या प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आणि पालकांनी देखील त्‍यांच्‍या स्‍तरावर घ्‍यावयाची खबरदारी, यासारख्‍या विविध मुद्यांबाबत शिक्षकांना सुयोग्‍य प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने महापालिका शाळांमधील निवडक १५० शिक्षकांना ‘प्रशिक्षक’ म्‍हणून प्रशिक्षण देण्‍याचा शुभारंभ नुकताच करण्‍यात आला आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त सुरेश काकाणी यांच्‍या उपस्थितीत नुकताच करण्‍यात आला. हे विशेष प्रशिक्षण शीव परिसरात असणाऱ्या महापालिकेच्‍या लोकमान्‍य टिळक वैद्यकीय महाविदयालय व सर्वोपचार रुग्‍णालयाद्वारे देण्‍यात येत आहे. या कार्यक्रमाला रुग्‍णालयाचे अधिष्‍ठाता डॉ. मोहन जोशी, उपायुक्‍त (सार्वजनिक आरोग्‍य) देवीदास क्षीरसागर, जन औषध वैद्यकशास्त्र विभागाच्‍या प्रमुख प्रा. डॉ. सीमा बनसोडे – गोखे, शिक्षणाधिकारी केटल केमिकल प्रा. लि. या खासगी संस्‍थाद्वारे सहाय्य प्राप्‍त झाले.

या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्‍यान सोशल डिस्टन्सिंग सुयोग्‍य प्रकारे पाळता यावे, यासाठी १२० व्‍यक्‍तींची क्षमता असणाऱ्या सभागृहात दररोज केवळ ३० शिक्षकांना प्रशिक्षण देण्‍यात येत आहे. यानुसार सलग ५ दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण १५० शिक्षकांना ‘कोविड’ प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांबाबत प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. हे प्रशिक्षण प्राप्‍त शिक्षक त्‍यांच्‍या शाळांमधील इतर शिक्षकांना आणि जवळपासच्‍या परिसरातील मनपा शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. तर या प्रशिक्षणानंतर याच पध्‍दतीने खासगी – प्राथमिक शाळांमधील शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्‍याचे प्रस्‍तावित असल्‍याचे महापालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी कळविले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details