- ठाणे -२०१४ साली वाशी टोल नाका येथे मनसेच्या कार्यकत्यांनी खळ्खट्याक आंदोलन केल्याने कार्यकर्त्यांसह मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांना अनेकदा न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आला होता. मात्र, राज ठाकरे उपस्थित न राहिल्याने अखेर बेलापूर न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले होते. त्यामुळे आज राज ठाकरे स्वत: न्यायालयात हजर राहणार आहेत. तिथून ते सिवूड येथील मनसे कार्यालयाला भेट देणार आहेत. यावेळी चार ते पाच हजार कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या स्वागताला येणार असल्याची माहिती आहे.
सविस्तर वाचा-LIVE UPDATE : मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाशी न्यायालयाकडून जामीन मंजूर
- कोल्हापूर - येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क मुदत संपलेले सलाईन रुग्णाला दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अक्षम्य हलगर्जीपणावरून आता सीपीआर रुग्णालयावर टीकेची झोड उठताना दिसत आहे.
सविस्तर वाचा-कोल्हापुरात सीपीआरमध्ये रुग्णाच्या जीवाशी खेळ, मुदत संपलेले सलाईन रुग्णाला दिले
- नाशिक -कारमध्ये चालक बसलेला असताना दुचाकीस्वारांनी काच फोडून लाखोंची रोकड लांबविल्याची घटना नाशकात घडली आहे. येथील मुंबई नाका पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.
सविस्तर वाचा-नाशिक : अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून 15 लाख लांबवले
- गंगापूर(औरंगाबाद) : टायर फुटल्याने अनियंत्रित झालेले ट्रॅक्टर नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार, तर दहा जण जखमी झाल्याची घटना औरंगाबादच्या गंगापूरमध्ये घडली आहे. जखमींना उपचारासाठी औरंगाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा-गंगापुरात ट्रॅक्टर नदीत कोसळून एक ठार, 10 जखमी
सविस्तर वाचा- चक्का जाम आंदोलन LIVE UPDATE : दिल्लीसह उत्तर भारतात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त
- मुंबई : देशाची दुसरी खासगी ट्रेन असलेली मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस येत्या 14 फेब्रुवारी म्हणजेच 'व्हॅलेंटाईन डे'च्या मूहुर्तावर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशनकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई ते अहमदाबाद प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी तेजस एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या नवीन जोडप्यांचे आयआरसीटीसीकडून थाटात स्वागत केले जाणार आहे.