मुंबई -विधानसभा निवडणुकांना सुरुवात झाली आहे,प्रचाराचा उत्साह शिगेला पोहोचत आहे.शरद पवार,देवेंद्र फडणवीस,उद्धव ठाकरे,अमित शाह,राज ठाकरे,प्रकाश आंबेडकर,असदुद्दीन ओवैसी या सारखी महाराष्ट्र आणि देशातील मातब्बर नेतेमंडळी रणधुमाळीत उतरली आहे.ठिकठिकाणी सभा,दौरे,जनसंपर्क अभियान,वेगवेगळे कार्यक्रम जवळपास दररोज आयोजित करण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जळगाव व भंडारा येथे प्रचारसभा होत आहे.या पार्श्वभूमीवर नेत्यांचा आजचा(रविवार, 13ऑक्टोबर)राजकीय दिनक्रम.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
जळगाव
युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची जळगावात रविवारी सकाळी 11.30वाजता जाहीर सभा...
भंडारा
साकोली येथे सभा होणार आहे
- राहुल गांधी
लातूर
औसा येथे दुपारी2वाजता राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे
मुंबई
राहुल गांधी यांची धारावी येथे सभा
चांदिवली येथे दुसरी जाहीर सभा
- शरद पवार
जळगाव
आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथे रविवारी दुपारी4वाजता तसेच चाळीसगाव येथे सायंकाळी6वाजता सभा
- अमित शाह
पुणे
भाजप नेते अमित शहा यांचा पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे रोड शो आहे.
योगी आदित्यनाथ
यवतमाळ
उमरखेड मतदार संघातील उमेदवार नामदेव ससाणे यांच्या प्रचारार्थ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची13ऑक्टोबरला उमरखेड येथी सकाळी10वाजता जिल्हा परिषद ग्राउंड येथे जाहीर सभा
लातूर
उदगीर येथे दुपारी2वाजता योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे
हिंगोली
महायुतीचे उमेदवार तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रचारार्थ रविवारी (१३ऑक्टोबर)हिंगोली येथे दुपारी साडेबारा वाजता योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा होणार आहे.
- मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस
बुलडाणा
दुपारी ०१.४५ वा. –सी.एस.कोठारी विद्यालय,छत्रपती शिवाजी महाराज चौक,नांदुरा,जि.बुलढाणा येथे जाहीर सभा