महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महाराष्ट्र बंद : शिवसेनेच्या सहभागाने मुंबईत भाजपाच्या गडातही बंद यशस्वी

द्रीय गृह राज्य मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू. या विरोधात केंद्र सरकारने अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. शेतकऱ्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात असून या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि या घटनेचा निषेध म्हणून बंद पुकारण्यात आला आहे.

मुंबईत भाजपाच्या गडातही बंद यशस्वी
मुंबईत भाजपाच्या गडातही बंद यशस्वी

By

Published : Oct 11, 2021, 12:36 PM IST

Updated : Oct 11, 2021, 12:48 PM IST

मुंबई- उत्तरप्रदेशमधील लखीमपूर येथे शेतकऱ्यांचे अमानुष हत्याकांड, वाढती महागाई शेतकरी विरोधी कायदे याच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी पक्षांनी आज सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला भाजपाने विरोध केला होता. मात्र त्यांतरही भाजपाच्या गड असलेल्या घाटकोपरमध्ये बंद पाळण्यात आल्याचे दिसून आले आहे.

शिवसेनेचा सहभाग म्हणजे बंद यशस्वी-

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी मध्ये शेतकरी शांततापूर्वक उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून आंदोलन करत होते. परंतू केंद्रीय गृह राज्य मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू. या विरोधात केंद्र सरकारने अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. शेतकऱ्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात असून या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि या घटनेचा निषेध म्हणून बंद पुकारण्यात आला आहे.

राज्यात आणि मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेना सहभागी झाल्याने बंद यशस्वी होतो, असा इतिहास आहे. यामुळे मुंबईत 100 टक्के बंद दिसून येत आहे. मुंबईत अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद आहेत. बेस्टच्या 8 बसेसवर दगडफेक झाल्याने काही तुरळक बसेस चालवल्या जात आहेत.

मुंबईत भाजपाच्या गडातही बंद यशस्वी
भाजपाच्या गडात बंद यशस्वी -

महाविकास आघाडी सरकारने जो बंद पाळला आहे त्याला राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने विरोध केला आहे. भाजपाच्या विरोधानंतरही त्यांचा गड मानल्या जाणाऱ्या विभागात बंद पाळला गेला आहे. घाटकोपर पूर्वेला पराग शाह तर घाटकोपर पश्चिमेला राम कदम हे भाजपाचे दोन आमदार आहेत. भाजपाने बंदला विरोध केला असताना या दोन्ही आमदारांच्या विभागात बंद पाळण्यात आला. यामुळे भाजपाच्या गडातही बंद यशस्वी झाला आहे.

काय आहेत मागण्या -

1) शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे कृषी कायदे रद्द करावेत 2) कामगारांना उद्ध्वस्त करणारे कामगार कायदे रद्द करावेत
3) पेट्रोल डिझेल घरगुती गॅस इंधन दरवाढ कमी करावी महागाई कमी करावी
4) सरकारने सरकारी उद्योगधंद्यांचे खाजगीकरण थांबवावे
5) लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये घडवून आणलेले अमानुष हत्याकांडाचा निषेध

हेही वाचा - मोदीजी जगभर फिरतात, मात्र शेतकऱ्यांसाठी दिल्ली बॉर्डरपर्यंतही जात नाहीत; प्रियंका वाराणसीत गरजल्या

हेही वाचा - महाराष्ट्रात बंद, पण कोल्हापूर बाजार समितीचे सर्व व्यवहार सुरळीत, शेतकऱ्यांना दिलासा

Last Updated : Oct 11, 2021, 12:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details