महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Gold Silver Rates : सोन्यासह चांदीच्याही दरामध्ये वाढ.. पहा आजचे देशभरातील दर

सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. मात्र नुकतेच सोन्यावरील आयात शुल्कात केंद्र सरकारने वाढ केली असल्याने देशामध्ये सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. काल सोन्याच्या दरात घट पाहावयास मिळाली होती. मात्र आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईमध्ये सोन्याचा भाव आज रविवारी (दि. १० जुलै) वाढता राहिला आहे. आज मुंबईत सोन्याचा दर ५१९१० रुपये इतका आहे. तर देशातील इतर शहरांमध्येही भाववाढ झाली आहे.

TODAYS GOLD SILVER RATES 10 JULY 2022
सोन्यासह चांदीच्याही दरामध्ये वाढ.. पहा आजचे देशभरातील दर

By

Published : Jul 10, 2022, 6:42 AM IST

मुंबई - आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४६९५० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५१९१० रूपये आहे. चांदीच्या दरात २०० रुपयांनी वाढ झाली असून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ५७२ रूपये आहे. (Gold, Silver price Updates). सोने आणि चांदीच्या दरामध्ये मुंबईत वाढ झालेली पाहावयास मिळात आहे. तर देशातील इतर शहरांमध्येही भाववाढ झाली आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ५११५० रुपये
  • दिल्ली - ५१२१० रुपये
  • हैदराबाद - ५१२१० रुपये
  • कोलकत्ता - ५१२१० रुपये
  • लखनऊ - ५१३६० रुपये
  • मुंबई - ५१९१० रुपये
  • नागपूर - ५१२४० रुपये
  • पुणे - ५१२४० रुपये

देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ६२८०० रुपये
  • दिल्ली - ५७२०० रुपये
  • हैदराबाद - ६२८०० रुपये
  • कोलकत्ता - ५७२०० रुपये
  • लखनऊ - ५७२०० रुपये
  • मुंबई - ५७२०० रुपये
  • नागपूर - ५७२०० रुपये
  • पुणे - ५७२०० रुपये


सोन्याच्या वाढत्या आयातीला बसणार आळा :परदेशातून सोने आयात करणे आता महाग झाले आहे. केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 7.5 टक्क्यांवरून 12.50 टक्के केले आहे. सोन्याच्या वाढत्या आयातीला आळा घालण्यासाठी सरकारने ही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या घोषणेनंतर आता सोन्यावर 15 टक्के आयात शुल्क भरावे लागणार आहे. कारण 12.50 टक्के आयात शुल्काव्यतिरिक्त त्यावर 2.50 टक्के कृषी इंफ्रास्ट्रक्टर डेवलपमेंट सेसदेखील स्वतंत्रपणे आकारला जातो. त्यामुळे सोन्यावरील आयात शुल्क उपकर 10.75 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे.

..तरच शुद्ध सोने -सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.


हेही वाचा :Petrol Diesel Rates : औरंगाबादेत डिझेल ३ तर पेट्रोल २ रुपयांनी महागले.. पहा आजचे राज्यभरातील दर

For All Latest Updates

TAGGED:

gold rate

ABOUT THE AUTHOR

...view details