महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MAHARASHTRA BREAKING : पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक - मुंबई पाऊस

२०२४ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा होतील पंतप्रधान
२०२४ मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार;

By

Published : Jun 14, 2021, 6:36 AM IST

Updated : Jun 14, 2021, 10:37 PM IST

22:33 June 14

पुणे  -नगरपालिकेतील एका महिला अधिकाऱ्याला 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. टीडीआर प्रकरणी अहवाल देण्यासाठी ही लाच मागितली होती. मंजुषा इधाते असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. आज सायंकाळच्या सुमारास पुणे महापालिकेत हा सापळा रचण्यात आला होता.

15:12 June 14

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीचे उदघाटन

मुंबई -शिकाऊ वाहन चालकांना आता घरबसल्या लर्निंग लायसन्स मिळणार आहे. नवख्या चालकांना फक्त आधार कार्डच्या आधारे घरात बसून ऑनलाईन अर्ज करून परीक्षा देता येणार आहे. या ऑनलाईन लर्निंग लायन्स प्रणालीचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले आहेत.

13:15 June 14

काँग्रेस स्वबळावर लढणार आगामी विधानसभा; नाना पटोलेंचे स्पष्टीकरण

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. तसेच पक्षाध्यक्षांनी ठरवल्यास मी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचेही पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले

12:47 June 14

आमगाव नाल्यातील दोघांचे मृतदेह आढळले

दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत,पाण्याबाहेर काढण्याचं काम सुरू

12:46 June 14

खासदार संभाजी राजे आणि खासदार उदयन राजे यांची पुण्यातल्या औधमध्ये होणार भेट

 औंध मधील सिंध सोसायटीत थोड्या वेळात भेटणार दोन्ही राजे, मराठा आरक्षणाच्या मुद्ययावर भेटीला महत्व

12:26 June 14

कोल्हापूरमधील निर्बंध कमी केले जाणार नाहीत; उपमुख्यमंत्री अजित पवार

 उलट कोरोनाची निर्बंध वाढवण्याची गरज. कोल्हापुरातील जनतेकडून सहकार्य अपेक्षित- अजित पवार

11:40 June 14

परमबीर सिंह यांना हायकोर्टाकडून मिळालेला अटकेपासूनचा दिलासा 22 जूनपर्यंत कायम

परमबीर सिंह यांना हायकोर्टाकडून मिळालेला अटकेपासूनचा दिलासा 22 जूनपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी घेत असलेले न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांनी कोर्ट आज कामकाजासाठी उपलब्ध नसल्यान ही सुनावणी २२ तारखेपर्यंत पुढे ढकलली आहे. तसेच फोन टॅपिंग प्रकरणी एफआयआर रद्द करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेचीही सुनावणीही तूर्तास तहकूब करण्यात आली आहे. 

10:55 June 14

आमगाव देवळीतील नाल्यात दोन मुले बुडाल्याची शक्यता

आमगाव देवळी येथील नाल्यात दोन मुले बुडाल्याची शक्यता, नाल्याच्या काठावर कपडे मिळाले. मात्र अजून मुलांचा पत्ता नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहीम सुरू केली आहे.

10:51 June 14

गँगस्टर फहिम मचमचच्या नावाने घाटकोपर येथील व्यावसायिकाला धमकी, मुंबईत अंडरवर्ल्ड पून्हा सक्रीय

घाटकोपरमधील एका व्यापाऱ्याला परदेशातून कॉल करून 50 लाखांच्या खंडणीची मागणी केली जात होती. या प्रकरणी व्यावसायिकाने घाटकोपर पोलीस ठाण्यात तकार देऊन गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पुढील तपासासाठी हा गुन्हा खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे.

डी कंपनीत दाऊद, छोटा शकिलनंतर राजनचे स्थान होते, मात्र राजनने डी कंपनी सोडल्यानंतर फहिमने त्याची जागा घेतली आहे. फहिमचे नाव २००३ मध्ये सर्व प्रथम प्रसिद्धीझोतात आले. फहिम मचमचने एका विकासकाकडून जबरदस्ती पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला होता. दाऊदसाठी हप्ते वसूली करणारा फहिम हा प्रचंड बडबड्या होता. त्यामुळ्च त्याला मचमच हे टोपन नाव पडले.  

फहिम मचमचवर मुंबईत शेकडो धमकीचे गुन्हे दाखल आहेत. फहिम हा डी कंपनीसाठी शार्प शूटरची भरती करतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फहिमने काही वर्षांपासून यूपी, रत्नागिरी, मध्यप्रदेश, कुर्ला, गोवंडी, साकीनाका,  पंजाब, राजस्थान या राज्यातून २०१८ मध्ये तरुणांची भरती डी कंपनीत केली होती. हे शार्प शूटर त्याने फेसबुकच्या मदतीने शोधून काढले होते. वांद्रे एका सामाजिक कार्यकर्ता महिलेच्या हत्येचा कट उधळत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून फहिमच्या या कृत्याची माहिती पोलिसांना मिळाली.

10:44 June 14

जमीन घोटाळ्याच्या प्रकरणाने आस्थेला तडा; राम मंदिराच्या वर्गणीत घोटाळा नको - संजय राऊत

  • राम मंदिराच्या नावाखाली वर्गणी गोळा केली आहे. त्यामुळे रामाच्या नावावर एका पैशाचाही घोटाळा होता कामा नये.
  • जमीन घोटाळ्याचे प्रकरण समोर आल आहे.  याने आमच्या आस्थेला तडा गेलाय. मात्र, याबाबत ट्रस्टचे जे प्रमुख आहेत त्यांनी समोर येऊन खरी परिस्थिती सांगायला हवी, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली.
  • आपचे खासदार संजय सिंह यांची सकाळीच फोनवर चर्चा झाली. मी हा पर्दाफाश पाहिला.
  • अयोध्येचा लढा हा आस्थेचा अस्मितेचा होता. मात्र, आम्ही त्याचे राजकारण केले नाही, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले. ट्रस्टचे सदस्य हे भाजपकडून नेमले आहेत. सेनेसारख्या संघटनेतील एखादा दुसरा सदस्य असता तर बरं झालं असते, असेही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.
  • शेकडो कोटींचा निधी राम मंदिराला मिळाला. ऊद्धव ठाकरे यांनी एक कोटी रुपये दिले आहेत. या नीधीचा जर गैरवापर होत असेल तर श्रद्धेला महत्व राहणार नाही.
  • सरकारच्या वतीने, आरएसएस प्रमुख मोहनराव भागवत, वीएचपीने आणि सगळ्यांनी खूलासा करायला हवा, असेही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.

09:58 June 14

पंतप्रधान मोदींनी इस्राईलचे नवनियुक्त पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांना दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राईलचे नवनियुक्त पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांना शुभेच्छा दिल्या. मी आपल्याला भेटण्यासाठी आणि दोन्ही राष्ट्रामधील संबंध अधिक चांगला करण्यासाठी उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटेल आहे.

09:49 June 14

अजित पवारांनी कोल्हापुरात घेतली श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट; मराठा आरक्षणावर चर्चा

कोल्हापूर- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट,  गेल्या अर्ध्या तासाहून अधिक वेळ दोघांमध्ये चर्चा सुरू आहे.  

कोल्हापुरातील न्यू पॅलेसवर अजित पवार यांनी घेतले श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट 

कोल्हापुरात येताच त्यांनी घेतली सर्वात पहिला शाहू छत्रपती यांची भेट 

संभाजीराजे यांच्या अनुपस्थितीत केवळ अजित पवार आणि शाहू छत्रपती यांच्यात चर्चा

मराठा आरक्षण प्रश्नी बुधवारी कोल्हापुरात आंदोलनाची संभाजीराज्यांनी हाक दिल्यानंतर अजित पवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या भेटीला, त्यामुळे ही बैठक महत्त्वपूर्ण 

 

09:00 June 14

मुंबईत आज पेट्रोल दर प्रति लिटर 102.58 रुपये; तर डिझेल 94.70 रुपये प्रति लिटर

06:25 June 14

२०२४ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा होतील पंतप्रधान; प्रशांत किशोर- पवार भेटीवर आठवलेंचा निशाणा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने प्रशांत किशोरच्या मदतीशिवाय ३०३ जागांवर विजय मिळवला आहे. तसेच अनेक विरोधी पक्षांचा संसदेत भाजपाला पाठिंबा आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीतही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात एनडीए विजयी होईल, असे मत केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. तसेच प्रशांत किशोर के मत बनो आदी, नरेंद्र मोदी पक्के आंबेडकरवादी, २०२४ मे फिरसे पीए बनेंगे मोदी, अशी कविता करत आठवले यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. 
 

06:19 June 14

राज्यात म्युकरमायकोसिस एकूण बाधितांचा आकडा ७३९५; तर ६४४ जणांचा मृत्यू

राज्यात म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य संसर्गाचे एकूण बाधित रुग्णसंख्या 7,395 वर पोहोचली आहे. यापैकी 644 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 2,212 जणांनी या आजारावर उपचारानंतर मात केली आहे. राज्यात पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर  या जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण अधिक आहेत. 
 

06:04 June 14

रविवारी राज्यात १० हजार ४४२ कोरोना बाधितांची भर, ४८३ जणांचा बळी

महाराष्ट्रात रविवारी 10,442 नवीन कोरोनाबाधितांची भर , तर 7,504 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. रविवारी 483 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण बाधितांचा आकडा हा 59,08,992 वर पोहोचला आहे. तर 56,39,271 कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृतांची एकूण आकडेवारी 1,11,104 वर पोहोचली आहे. तर सध्यस्थितीत राज्यात एकूण 1,55,588 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Last Updated : Jun 14, 2021, 10:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details