महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MAHARASHTRA BREAKING LIVE : मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

अरुणाचल प्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के
अरुणाचल प्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के

By

Published : Jun 11, 2021, 6:22 AM IST

Updated : Jun 11, 2021, 5:11 PM IST

17:07 June 11

ओव्हर हेड वायरमध्ये पेंटाग्राप अडकल्यामुळे ट्रेन बंद

मुंबई - मध्य रेल्वेच्या वासिंदवरून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकलच्या ओव्हर हेड वायरमध्ये पेंटाग्राप अडकल्यामुळे ट्रेन बंद पडल्या आहे. रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी पोहोचून बिघाड दुरुस्तीची करण्याचा प्रयत्न करत आहे.

15:20 June 11

शेतात काम करताना झाला दोघांचा मृत्यू

यवतमाळ -दारव्हा तालुक्यातील कुंभारकीन्ही आणि मोरगव्हान येथे अंगावर वीज कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी १० जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. आकाश प्यारेलाल जाधव (३०) व अशोक रायसिंग राठोड रा. मोरगव्हान, असे मृत्यूझालेल्या दोघांची नावे आहेत.

15:10 June 11

मुंबई - धोकादायक इमारत दुर्घटनेसंदर्भात हायकोर्टात दाखल सुमोटो याचिकेवर सुनावणी करण्यात आली. यावेळी महापौरांनी माध्यमांना मालाड दुर्घटनेनंतर दिलेल्या मुलाखतीचे भाषांतर आम्ही सादर करू, अशी माहिती मुंबई महपालिकेकडून हायकोर्टात देण्यात आली. तसेच इमारत पडण्याला हायकोर्टाचे निर्देश कारणीभूत असल्याच्या आरोपावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. 

12:34 June 11

महाराष्ट्राच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली, राजकारण नाही

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजशिष्टाचार भाग म्हणून महाराष्ट्राच्या रखडलेल्या मुद्यांवर पंतप्रधानांची घेतली भेट, यात राजकारण करण्याच कारण नाही

12:28 June 11

चंद्रकांत पाटलांनी पिजऱ्यात येऊन वाघाच्या मिशीला हात लावून दाखवावा- संजय राऊत

चंद्रकांत पाटलांना फार गांभीर्याने घेवु नका, चंद्रकांत पाटलांचा काल वाढदिवस होता. त्यांनी जास्त केक खाल्ला असेल. शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, तर त्यांना मी पिंजऱ्यात येण्याचे आमंत्रण देतो. हिम्मत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावुन दाखवा - संजय राऊत

  • काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून जाण्याच्या वाटेवर असल्याने काँग्रेसने संघटना मजबुत करावी,  त्यांना सामनामधून पक्ष संघटन मजबुती बाबत सांगितले आहे. विरोधी पक्षाने अधिक मजबुत असावे
  • प्रशांत किशोर हे राजकीय रणनितीकार आहेत.  एखादा सर्वे करण्यासाठी किंवा एखाद्या मुद्यावर भेट घेतली असेल.  त्यामुळे त्याकडे फार लक्ष घालण्याची गरज नाही
  • मराठा आरक्षणा संदर्भात राज्याची काही भूमिका राहिलीच नाही, आता जे काही करायचे ते केंद्रालाच करावे लागेल
  • मराठा आरक्षणासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांची भेट घेतली

12:27 June 11

पुणे पोलिसांचे कौतुकही केलेय, अजित पवारांचे स्पष्टीकरण

ज्या गोष्टी कुणाच्याही लक्षात येत नाही ते बारकावे मी सांगितले. त्याबाबत थोडीशी नाराजी व्यक्त केली. पण पत्रकार तिथं असल्यामुळे तेच व्हायरल झाले. पोलिसांनी चांगले काम केले आहे, त्याचंही कौतुक केले असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.

12:19 June 11

मोदी, आदित्यनाथ यांच्याकडून कोरोनाचे अपयश झाकण्याचा प्रयत्न - नवाब मलिक

देश आणि उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये काही तर बिनसल्याच्या बातम्या चालत आहेत. मात्र, हा प्रकार कोरोनाचे अपयश लपवण्यासाठी भाजपाकडून जाणीवपूर्वक पडदा टाकण्याचा प्रकार असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. 

12:12 June 11

परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

परबीरसिंह यांनी त्यांच्या चौकशीचे प्रकरण बाहेरील राज्यात वर्ग करण्याची विनंती केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळली आहे

12:08 June 11

मालाड इमारत दुर्घटनेप्रकरणी उच्च न्यायालयात सुमोटो याचिका; आज दुपारी 2 सुनावणी

11:59 June 11

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर शरद पवार यांच्या भेटीला

11:49 June 11

लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाही, दुसरा डोसही सर्वांना देऊ - महापौर

कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या डोसपासून कोणीही वंचीत राहणार नाही, प्रत्येक वार्डात जास्तीत जास्त २० हजार घरे असतील. आमचे महापालिका कर्मचारी किंवा पक्षाचे कार्यकर्ते नागरिकांचे रिपोर्टकार्ड आणतील. आम्ही त्यांच्या पत्त्यावर जाऊन त्यांना कोरोना लस घेण्यासाठी मार्गदर्शन करू, झोपडपट्टीतील नागरिकामध्ये लसीकरणाची जनजागृती करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

11:43 June 11

नालेसफाई चांगल्याच पद्धतीने झाली, पाणी साठण्याची अन्यही कारणेही आहेत

केवळ नाले सफाईमुळे मुंबईत पाणी भरत नाही. नालेसफाई चांगल्या प्रकारे झाली आहे. पाणी साठण्याची अनेक कारणे आहेत. ज्या ठिकाणी रेल्वेचे पाणी येते त्या ठिकाणी पंप लावण्यात आले आहेत. तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

11:41 June 11

आषाढी वारी - रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधांसह परवानगी

देहू, आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी 

उर्वरित 8 पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येक 50 वारकऱ्यांना मुभा 

आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधांसह परवानगी 

11:40 June 11

पुण्यातील सर्व मॉल, दुकाने सोमवार पासून उघडणार - अजित पवार

दुकाने रात्री 8 पर्यंत उघडण्यास परवानगी

11:26 June 11

वारकऱ्यांना यंदाही पांडुरंगाचे दर्शन नाहीच; पालख्या बसनेच जाणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूमधून तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी १०० लोकांना परवानगी

इतर ८ पालखी सोहळ्याला ५० लोकांना परवानगी देण्यात येणार

गतवर्षी प्रमाणे बसनेच पालख्या पंढरपूरला जाणार,

सर्व खबरदारी घेऊन पालखी सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार

11:20 June 11

मालाड मालवणी दुर्घटने प्रकरणी बांधकाम ठेकेदारास अटक

मालाड मालवणी इमारत दुर्घटना प्रकरणी इमारतीचा बांधकाम ठेकेदार रमझान शेख याला अटक करण्यात आली आहे. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला होता.

07:36 June 11

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज पंतप्रधान मोदींची घेणार भेट

07:33 June 11

कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यात पुढील तीन तासात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यात पुढील तीन तासात मुसळधार पावसाचा इशारा वेधळाळेने दिला आहे. सध्या मुंबई उपनगरता जोरदार पावसाला सुरुवात, अंधेरी पश्चिममध्ये सखल भागात पाणी साचायला सुरुवात

06:56 June 11

मुंबईत पहाटेपासून पावसाला सुरुवात; आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत आज पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. सायन परिसरात पावसामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरु. दरम्यान आज मुंबई आणि उपनगरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

06:27 June 11

राज्यात गुरुवारी १२,२०७ नवीन रुग्णांचे निदान

गुरुवारी राज्यात ११,४४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले.  राज्यात आजपर्यंत एकूण ५६,०८,७५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४५% एवढे झाले आहे. 

राज्यात गुरुवारी ३९३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद 

06:09 June 11

प्रत्येक पालखीसोबत ४० वारकऱ्यांना परवानगी

अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम कामेंगमध्ये पहाटे ४.५३ वाजताच्या सुमारास भूकंपाचे हादरे जाणवले. याची रिश्टरस्केलवर 3.6 इतकी तीव्रता नोंद झाली आहे. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीने याची माहिती दिली.

Last Updated : Jun 11, 2021, 5:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details