महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MAHARASHTRA BREAKING LIVE: मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला 'सिल्व्हर ओक'वर, चर्चांना उधाण - अनिल देशमुख प्रकरण

BIG Breaking News
BIG Breaking News

By

Published : Jun 28, 2021, 6:56 AM IST

Updated : Jun 28, 2021, 8:54 PM IST

20:53 June 28

मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट.. वांद्रे सी-लिंक ते कलानगर उड्डाण पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे उद्धाटन

मुंबई - वांद्रे परिसरात रहदारी वाढली आहे. परिणामी वाहतूक कोंडी होत असते. वांद्रे सी-लिंक ते कलानगर उड्डाण पुलांची दुसरी मार्गिका सुरु झाल्यास वाहतूक कोंडी फोडण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज फीत कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून उड्डाणपुलाची मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.  

20:53 June 28

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत चार लाख लोक बाधित

मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाच्या दोन लाटा आल्या. दुसऱ्या लाटेदरम्यान मुंबईमधील ४ लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या १० हजार ५०० जणांना तर दोन्ही डोस घेतलेल्या फक्त २६ जणांनाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी लसीकरण आवश्यक आहे, हे यावरून स्पष्ट झाले आहे.  

20:52 June 28

पावसाळी अधिवेशन : विधानभवनात प्रवेशासाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य

मुंबई –महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत ५ आणि ६ जुलै हे दोन दिवस चालणार आहे. विधानभवनात येणाऱ्या प्रत्येकाला आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची केली आहे. विधान भवनात आज उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य शासनाने दिली.  

दोन्हीही सभागृहांचे सदस्य, त्यांच्या वाहनांचे चालक आणि वाहनातून मुंबईत येणारे सहप्रवासी अशा सर्वांनी सोयीच्या ठिकाणी मान्यताप्राप्त लॅबमध्ये दिनांक ३ किंवा ४ जुलै, २०२१ या निर्धारित वैध कालावधीसाठीची RT-PCR चाचणी करून त्याचा अहवाल विधानभवन प्रवेशासाठी सोबत ठेवणे आवश्यक असणार आहे. लसीकरणातील पहिला वा दुसरा डोस घेतलेल्यांना तसेच कोविड-१९ संदर्भातील प्रतिपिंड (अँटीबॉडी) चाचणीचा सकारात्मक अहवाल असणाऱ्यांना सुध्दा RT-PCR चाचणी करणे अनिवार्य राहणार आहे.

19:00 June 28

पालघर : ओसरविरा येथे वीज पडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू; तीन जण जखमी

पालघर -  डहाणू तालुक्यातील ओसरविरा गावात अंगावर वीज पडून एका मुलाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ओसरविरा येथील चार मुले गुरे चारण्यासाठी शेतावर गेली होती. चार वाजताच्या सुमारास शेतावर गेलेल्या या मुलांच्या अंगावर वीज पडल्याची घटना घडली. या घटनेत रवींद्र बच्चू कोरडा (वय 15) या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मेहुल अनिल मानकर (वय 12), चेतन मोहन कोरडा (वय 11), दिपेश संदीप कोरडा (वय 14) ही तीन मुले जखमी झाली आहेत. ही सर्व मुले ओसरविरा येथील मानकरपाडा येथील रहिवासी आहेत. 

16:46 June 28

संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर दाखल, चर्चांना उधाण

मुंबई - शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहे. राऊत यांनी सकाळी वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

16:19 June 28

अनिल देशमुख प्रकरणी अ‌ॅड. तरुण परमार ईडी कार्यालयात दाखल

मुंबई -गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मनी लाँड्रींगची तक्रार करणाऱ्या नागपूरमधील अ‌ॅडव्होकेट तरुण परमार यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी तरुण परमार ईडी कार्यालयात हजर झाले आहेत.

14:56 June 28

मुंबईमधील ५८ टक्के मुलांमध्ये अँटीबॉडीज

मुंबई -मुंबईतील ५८ टक्के मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत.  मे आणि जून महिन्यात करण्यात आलेल्या सेरो सर्वेमधून ही बाब उघड झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान हा सर्व्हे करण्यात आला होता. ६ ते १८ वयोगटातील मुलांचा यामध्ये सहभाग करून घेण्यात आला होता. मुंबई महापालिकेच्या २४ विभागात हा सर्व्हे करण्यात आला होता.

14:01 June 28

प्रदीप शर्मा यांना 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा यांना 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं हा निर्णय दिला. 

12:34 June 28

राज्यात येत्या पाच दिवसात महाराष्ट्रात मान्सूनची सक्रीयता कमीच

हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या पाच दिवसात महाराष्ट्रात मान्सूनची सक्रीयता कमीच राहणार आहे. असे असले तरी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी तुरळक ठिकाणी हजेरी लावू शकतात. रविवारी कोकणात सर्वत्र विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस झाला.

12:33 June 28

महाराष्ट्रात रविवारपर्यंत 3 कोटी 11 लाख 59 हजार 607 नागरिकांचे लसीकरण

महाराष्ट्रात रविवारपर्यंत 3 कोटी 11 लाख 59 हजार 607 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि.26 जून 2021 रोजी1,20,120 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

11:39 June 28

अॅडव्होकेट तरुण परमार ईडी कार्यालयात दाखल

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मनी लॉंडरिंगची तक्रार करणाऱ्या नागपूर मधील अॅडव्होकेट तरुण परमार यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार आज परमार हे ईडी कार्यालयात हजर झाले आहेत.
 

11:05 June 28

आयपीएस परमबीर सिंग दोन महिन्यांच्या सुट्टीवर

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांचा आरोप करून खळबळ माजवणारे माजी मुंबई पोलीस आयुक्त व राज्य गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग हे तब्बल 2 महिन्यांच्या सुट्टीवर गेले असल्याची माहिती समोर येत आहे. 

10:25 June 28

देवेंद्र फडणवीस यांना आम्ही संन्यास घेऊ देणार नाही त्यांची राज्याला खूप गरज आहे : शिवसेना नेते संजय राऊत

हे सरकार पाच वर्ष टिकेल यात शंकाच नाही. हे विधान शरद पवार यांनी आधीही केलंय. आमच किमान वाटप धोरण ठरलेलं आहे. त्यानुसार कधी कधी भांड्याला भांड लागायचंच. युतीच्या काळात तर आमची भांडी फुटायचीच. तरीही पाच वर्ष सरकार टिकलं, असेही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणालेत.

09:46 June 28

देशात गेल्या २४ तासांत ४६ हजार १४८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

देशात गेल्या २४ तासांत ४६ हजार १४८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ५८ हजार ५७८ जण कोरोनामुक्त; ९७९ मृत्यूमुखी

09:36 June 28

कोल्हापुरात व्यापारी आणि पोलिसांमध्ये वादावादी

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटाचा धोका टाळण्यासाठी राज्यातील निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा आपली आस्थापने बंद ठेवावी लागणार आहेत. परिणामी याबाबात व्यापारीवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर कोल्हापुरात या नाराजीचे पडसाद वादावादीत बदलत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये दुकाने बंद ठेवण्यावरून वाद निर्माण होत आहे.

07:31 June 28

राज्यात आजपासून राज्यात पुन्हा निर्बंध; डेल्टा प्लसचा धोका टाळण्यासाठी पाऊल

राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्यानंतर सरकारने तिसऱ्या टप्प्यात असलेल्या शहरांसाठी निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार आजपासून दिवसभर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सायंकाळी ४ वाजेपर्यंतचे दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत. 

06:13 June 28

MAHARASHTRA BREAKING LIVE: अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा यांना 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

धुळ्यातील कापड बाजाराला भीषण आग लागल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली, या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत.  

Last Updated : Jun 28, 2021, 8:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details