महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BIG BREAKING : आयकर विभागाची कारवाई संपल्यानंतर उत्तर देणार - अजित पवार; आयकराच्या धाडी या व्यक्तीगत हल्ला - सुप्रिया सुळे - शरद पवार

Breaking news
Breaking news

By

Published : Oct 8, 2021, 9:36 AM IST

Updated : Oct 8, 2021, 7:30 PM IST

19:24 October 08

दीक्षाभूमीवर होणारे सर्व कार्यक्रम रद्द, दीक्षाभूमी स्तुपातील दर्शन घेता येणार - डॉ. सुधीर फुलझले

नागपूर -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवर होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहे, यात मात्र लोकाग्रहास्तव दीक्षाभूमी स्तुपातील दर्शन घेता येणार आहे, या दर्शनासाठी 18 वर्षाखालील आणि 65 वर्षवरील लोकांना प्रवेश नसणार आहे. दोन्ही डोस झाल्याने लसीकरण प्रमाणपत्र सोबत आणून प्रवेश दिला जाईल, एकाच रांग असल्याने दर्शनासाठी भाविकांनी थोडा विलंब होणार आहे. प्रसाद अन्नवाटपाला दीक्षाभूमी परिसरात बंदी असणार आहे. 14 ऑक्टोंबरला सकाळी 9 वाजता मोजक्याच लोकांच्या उपास्थित ध्वजारोहण होईल. 15 ऑक्टोबरला 9 वाजता पूज्य भन्ते नागार्जुन सुरइ ससाइ यांच्या उपस्थितीत स्मारक समितीच्या लोकांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना होईल अशी माहिती दीक्षाभूमी स्मारक समिती सचिव डॉ. सुधीर फुलझले यांनी दिली आहे. 

16:45 October 08

आयकराच्या धाडी या व्यक्तीगत हल्ला - सुप्रिया सुळे

पवार कुटुंबातील तिन्ही बहिणींच्या घर आणि कार्यालयावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या, याचे अजित दादा आणि मला अतिशय दुःख झाले. मात्र दादांना मी सांगितले की तुझ्या बहिणी या महाराष्ट्राच्या लेकी आहेत, त्या खुप खंबीर आणि लढणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आम्हाला विश्वास आहे. त्या यातून खंबीरपणे बाहेर पडतील याचा आम्हाला विश्वास आहे.  

केंद्रातील नेते हे नेहमी महाराष्ट्राचा उल्लेख करताना छत्रपतींचा उल्लेख करतात मात्र त्यांची कृती ही मोगलांच्या राजवटीसारखी आहे. छत्रपतींनी कधीही महिलांवर अन्याय, अत्याचार केला नाही. मात्र सध्याचे दिल्लीतील सरकार मोगलांसारखे वागत आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर केला. आयकराच्या धाडी या व्यक्तीगत हल्ला आहे असेही त्या म्हणाल्या. 

16:41 October 08

दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र झुकला नाही आणि झुकणार नाही - सुप्रिया सुळे

काल जे झाले ते दुर्देवी आहे. माझा माझ्या बहिणींवर पुर्ण विश्वास आहे. अजित दादा तु काळजी करू नको त्या खूप घट्ट आहेत. त्या सावित्री आणि जिजाऊच्या मातीतील लेकी आहेत. सत्याला लढायला अडचण नसते, दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र झुकला नाही आणि झुकणार नाही, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाले आहे. आयकर विभागाचे अधिकारी माझ्यापर्यंत येतीलही आले तर सामोरे जाईल. असेही त्या म्हणाल्या. 

16:34 October 08

आयकर विभागाची कारवाई संपल्यानंतर उत्तर देणार - अजित पवार

पुणे -माझ्याशी संबंधीत कंपन्या आणि इतरही सर्वांनी वेळेवर कर भरला पाहिजे, हे मी पहिल्यापासून सांगत आलो आहे. आर्थिक शिस्त कोणी मोडू नये यासाठी मी पूर्वीपासून आग्रही राहिलो आहे. शेतकऱ्यांना चिरडण्याचे काम ज्यांनी केले त्याचा निषेध म्हणून ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पाळला जाणार आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन यासंबंधीचा निर्णय घेतला आहे. आयकर विभागाच्या कारवाईत मी व्यत्यय आणणार नाही. आयकर विभागाची कारवाई संपल्यानंतर त्यावर उत्तर देणार आहे असे अजित पवार हे पुण्यात बोलताना म्हणाले. 

16:18 October 08

एअर इंडियाची मालकी टाटा सन्सकडे

मुंबई - टाटा सन्सने राष्ट्रीय विमानवाहक एअर इंडिया घेण्याची बोली जिंकलीन आहे. 

16:14 October 08

सगळ्यांनी मिळून कडकडीत हरताळ पाळावी - छगन भुजबळ

नाशिक - येवला, निफाड आणी सिन्नर या 3 तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सरकार नागरिकांसाठी काम करत आहे. मात्र, प्रत्येक व्यक्तीने स्वतःची, कुटुंबाची काळजी घ्यायला हवी असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे. केंद्राविरोधात बोलण्याचा कोणी प्रयत्न केला तर कारवाई केली जाते, शरद पवार यांनी जालियनवाला हत्याकांड बरोबर लखीमपूरची केलेली तुलना योग्यच आहे, पवार साहेब बोलले आणि नंतर हे सर्व सुरू झाले. केंद्रीय यंत्रणाकडून केली जाणारी कारवाई हा अतिरेक आहे. असे ते म्हणाले होते. भाजपाच्या मंत्र्यांच्या मुलाकडून घटना घडल्याने भाजपाचा विरोध आहे. सगळ्यांनी मिळून कडकडीत हरताळ पाळावा, शेतकरी विरोधी कृत्य केलय त्या विरोधात एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

15:22 October 08

शेतकरी हत्याकांडाच्या विरोधातील 'महाराष्ट्र बंद'ला शांततेत कडकडीत बंद पाळू - शरद पवार

सोलापूर - लखीमपूर खिरी येथे झालेल्या शेतकरी हत्याकांडाच्या विरोधात ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद आहे. सर्वांनी शांततेच्या मार्गाने कडकडीत बंद पाळून महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे दाखवून द्यायचे आहे, असे आवाहन सोलापूरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. 

15:18 October 08

अजित पवारांनी मानले आंदोलकांचे आभार; आयकर विभागाच्या कारवाई विरोधात पुण्यात आंदोलन

पुणे - आयकर विभागाच्या कारवाई विरोधात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्यांचे अजित पवारांनी आंदोलन स्थळी जाऊन आभार मानले.

14:22 October 08

  • मी भारतीय आहे. माझे पालक भारतीय असून भारतात राहत आहे. माझ्याकडे भारतीय पासपोर्ट आहे. मी चौकशीसाठी सहकार्य करत आहे. त्यामुळे देश सोडून पळून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा भावनिक साद आर्यन खानने न्यायालयाला घातली आहे.

13:35 October 08

नागपूर - एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर चार आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माधव नागर भागातील घटना घडली असून पीडित मुलीचे वय 17 वर्ष आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला असून एकाला घेण्यात आले आहे. 

13:29 October 08

आर्यन खान जामीन अर्ज सुनावणी अपडेट

  • आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू
  • आर्यन खानचे वकील आणि एनसीबीच्या वकीलामध्ये जामीन अर्जावरून जोरदार युक्तिवाद
  • न्यायाधीशांनी दोन्ही वकिलांच्या वादात केली मध्यस्ती
  • जर तुम्ही वाद घालाल, तर माझ्यासाठी निर्णय घेणे कठीण होईल, न्यायालयाची प्रतिक्रिया
  • एनसीबीची टीम आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा मेडिकल टेस्ट आणि आरटीपीसीआर चाचणीसाठी जे.जे रुग्णालयात दाखल
  • कोणत्याही वेळी जामीन अर्जावर निर्णय येण्याची शक्यता

12:41 October 08

महाराष्ट्र : ट्रेनमध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी परळी रेल्वे पोलिसांनी मुंबई एनसीबीच्या अधिकाऱ्याला अटक केली आहे. एनसीबीचे अधिकारी हैदराबादहून पुण्याला जात होते. या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला लवकरच न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती एसपी एम. पाटील यांनी दिली.  

12:31 October 08

  • मुंबई - आर्यन खानचे वकील सतीश मनेशिंदे आणि त्यांची टीम किला न्यायालयात दाखल झाले असून एनसीबीचे वकील अद्यापही न्यायालयात पोहोचलेले नाही.

12:31 October 08

  • महेशकुमार बाळूभाई धोडी हे काँग्रेसचे दादरा आणि नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार असतील
  • हरियाणातील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने डेरा सच्चा सौदाचा गुरमीत राम रहीम आणि अन्य चार जणांना रणजीत सिंह हत्या प्रकरणात दोषी ठरवले

11:41 October 08

मुंबई -न्यायाधीश आर. एम. निर्लेकर यांनी आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचासह आठ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचाच्या वकिलांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. यांच्या जामीन अर्जावर 12 वाजून 30 मिनिटांनी सुनावणी सुरू होणार आहे.

11:40 October 08

  • कोल्हापूर -अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवर दुसऱ्या दिवशीही प्राप्तीकर विभागाचे छापे
  • चार अधिकाऱ्यांकडून मुक्ता पब्लिकेशनमध्ये कागदपत्रांची पडताळणी दुसऱ्या दिवशीही सुरू
  • ऑफिसबाहेर सीआरपीचे जवान बंदोबस्तासाठी तैनात

10:25 October 08

  • नंदुरबार -आयर्न मल्टीट्रेड साखर कारखान्यात दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाच्या अधिकारी करत आहेत चौकशी
  • आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत सीआरपीएफचे जवान आज कारखान्यात दाखल
  • ही कंपनी पार्थ पवार यांच्या निकटर्तीयांची असल्याची माहिती

09:15 October 08

BIG BREAKING

रायगड- 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' वर रात्री आगीचा थरार पाहायला मिळाला. यावेळी काही वेळाच्या अंतरात आगीच्या दोन घटना घडल्या असून एक डस्टर कार जाळून खाक झाली आहे. तर दुसऱ्या घटनेत एका ट्रकचे टायर जळाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

Last Updated : Oct 8, 2021, 7:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details