मुंबई - राज्यात गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार असून दुसरी लाट आटोक्यात येत आहे. दुसरी लाट आटोक्यात येत असताना काल (सोमवारी) ४१४५, मंगळवारी ४४०८ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आज (बुधवारी) त्यात वाढ होऊन ५१२३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सोमवारी १०० मृत्यूची नोंद झाली, काल त्यात किंचित वाढ होऊन ११६ मृत्यूंची नोंद झाली होती. आज त्यात आणखी वाढ होऊन १५८ मृत्यूंची नोंद झाली आहे.
८१९६ रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात गुरुवारी ८१९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,०९,३६४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९३ टक्के एवढे झाले आहे. बुधवारी राज्यात ५,१३२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३५,४१३ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,१४,८९,०८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,०६,३४५ (१२.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,४६,२९० व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ५८,०६९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मृत्यूदर २.११ टक्के