मुंबई -राज्यसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षित निकाल आल्यामुळे महाविकास आघाडी ( Maha vikas Aghadi ) चिंतेत आहे. तर, भारतीय जनता पक्षाचा (BJP) आत्मविश्वास बळावला आहे. त्यातच 20 जूनला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेकडून प्रत्येकी दोन उमेदवार देण्यात आले आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाच उमेदवार आणि अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांना भाजपने पाठिंबा दिला असून, या निवडणुकीत दहा जागांसाठी 12 उमेदवार विधानपरिषदेच्या निवडणुकीत रिंगणात असणार आहेत. आज विधान परिषदेच्या निवडणुकीत ( Legislative Council candidature application ) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असून, दुपारी तीन वाजेपर्यंत ( Legislative Council election 2022 ) अर्ज मागे घ्यावे लागणार आहेत. मात्र, अद्याप तरी कोणत्याही पक्षाकडून ( Legislative Council election ) अर्ज मागे घेण्याबाबत हालचाली सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे, विधान परिषदेचा देखील आखाडा राज्यसभा निवडणुकीप्रमाणे रंगणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -धक्कादायक..! पुण्यात खासगी बस चालकाने अपहरण करत महिलेवर केला बलात्कार
राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आणि लहान पक्ष सोबत असून आपला विजय निश्चित होईल, असा विश्वास महाविकास आघाडीला होता. मात्र, अपक्ष आमदारांनी आपल्या सोबत दगाफटका केल्याचा आरोप शिवसेनेकडून केला गेला. आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडे आपले प्रत्येकी दोन उमेदवार निवडून आणण्याचे संख्याबळ आहे. मात्र काँग्रेसकडे तेवढे संख्याबळ नाही. काँग्रेस आमदारांच्या मतदानावर केवळ एक काँग्रेस उमेदवार निवडून येऊ शकतो. दुसऱ्या उमेदवारासाठी जवळपास दहा मतांची जुळवाजुळव काँग्रेसला करावी लागणार आहे. त्यासाठी राज्यसभेत ज्याप्रमाणे शिवसेनेला अपक्ष आणि लहान गटाची मनधरणी करावी लागली होती, त्याचप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत आता काँग्रेसला लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांची मनधरणी करावी लागणार आहे. मात्र, राज्यसभा निवडणुकीचा अनुभव बघता काँग्रेसला आता अधिक सावधगिरी बाळगावी लागेल.