महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विधानपरिषद उपसभापती पदाची आज होणार निवडणूक: शिवसेनेकडून निलम गोऱ्हे रिंगणात - शिवसेना

विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी आज दुपारपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. तर ४ वाजता मतदान होणार आहे. शिवसेनेकडून निलम गोऱ्हे यांचे नाव निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संग्रहित छायाचित्र

By

Published : Jun 24, 2019, 2:19 PM IST

मुंबई- विधानपरिषद उपसभापती पदासाठी आज मतदान होणार आहे. आज दुपारपूर्वी उपसभापती पदासाठी अर्ज सादर करता येणार आहे. तर 4 वाजता उपसभापती पदासाठी मतदान होणार आहे. विधानपरिषद उपसभापती पदासाठी शिवसेनेकडून आमदार निलम गोऱ्हे यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले आहे. तर दिवाकर रावते, विनोद तावडे, महादेव जानकर हे देखील रिंगणात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्यावर आली दिलगिरी व्यक्त करण्याची नामुष्की

जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्यावर सभागृहात चुकीचे उत्तर दिल्याने दिलगिरी व्यक्त करण्याची नामुष्की आली आहे. सावंत यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी केली, तर यांचे मानसिक खच्चीकरण होईल, असे विधान केले होते. यावर विरोधकांच्या आक्षेपानंतर ते विधान मागे घेत सावंत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details