महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात शनिवारी 67 हजार 123 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 419 जणांचा मृत्यू - महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढले

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. आज दिवसभरात 67 हजार 123 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 419 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 56 हजार 783 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट

By

Published : Apr 17, 2021, 9:50 PM IST

मुंबई - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. आज दिवसभरात 67 हजार 123 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 419 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 56 हजार 783 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर देखील प्रचंड ताण आला आहे.

राज्यातील कोरोना आकडेवारी

राज्यात शनिवारी दिवसभरात 67 हजार 123 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 37 लाख 70 हजार 707 वर पोहोचला आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 56 हजार 783 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनामुक्तांची एकूण संख्या ही 30 लाख 61 हजार 174 एवढी झाली आहे. आज दिवसभरात कोरोनामुळे 419 रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर 1.59 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 6 लाख 47 हजार 933 सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात या भागात झाली सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिका- 8,811
ठाणे- 1,074
ठाणे मनपा- 1,593
नवी मुंबई-1,175
कल्याण डोंबिवली- 1,453
उल्हासनगर-161
मीराभाईंदर-605
पालघर-698
वसई विरार मनपा-711
रायगड-822
पनवेल मनपा-800
नाशिक-1,646
नाशिक मनपा-2,182
अहमदनगर-2,189
अहमदनगर मनपा-913
धुळे- 183
जळगाव-1,127
जळगाव मनपा-134
नंदुरबार-365
पुणे- 3,792
पुणे मनपा- 6,084
पिंपरी चिंचवड- 2,949
सोलापूर- 1,163
सोलापूर मनपा-297
सातारा - 1,489
कोल्हापुर-349
कोल्हापूर मनपा-133
सांगली- 636
सिंधुदुर्ग-323
रत्नागिरी-358
औरंगाबाद-582
औरंगाबाद मनपा-814
जालना-902
हिंगोली-188
परभणी -554
परभणी मनपा-315
लातूर 1,262
लातूर मनपा-332
उस्मानाबाद-624
बीड -1227
नांदेड मनपा-482
नांदेड-1,025
अकोला मनपा-151
अमरावती मनपा-260
अमरावती 491
यवतमाळ-746
वाशिम - 673
नागपूर- 2,358
नागपूर मनपा-5,126
वर्धा-803
भंडारा-1,218
गोंदिया-864
चंद्रपुर-781
चंद्रपूर मनपा-270
गडचिरोली-304

हेही वाचा -राजावाडीत फक्त एका तासात होते लसीकरण, चांगल्या सुविधांमुळे लाभार्थी खुश

ABOUT THE AUTHOR

...view details