मुंबई -राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. आज राज्यात 54 हजार 22 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 37 हजार 386 रुग्णांनी कोरोनावर मात केली. गेल्या 24 तासांमध्ये 898 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यातील कोरोना परिस्थिती
आज राज्यात 54 हजार 22 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 49 लाख 96 हजार 758 वर पोहोचला आहे. तर आज 37 हजार 386 जणांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्तांचा एकूण आकडा 42 लाख 65 हजार 326 वर पोहोचला आहे. तर आज दिवसभरात 898 रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यातील मृत्यूदर 1.89 एवढा आहे. सध्या स्थितिमध्ये राज्यात एकूण 6 लाख 54 हजार 788 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यातील 'या' भागात झाली सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद
मुंबई महानगरपालिका- 3040
ठाणे- 672
ठाणे मनपा- 458
नवी मुंबई- 296
कल्याण डोंबिवली- 727
मीराभाईंदर-285
पालघर-608
वसई विरार मनपा- 999
रायगड-846
पनवेल मनपा-313
नाशिक- 1400
नाशिक मनपा- 1423
अहमदनगर-3357
अहमदनगर मनपा-612
धुळे- 158
जळगाव- 130
नंदुरबार-216
पुणे- 4415
पुणे मनपा- 2610
पिंपरी चिंचवड- 1973
सोलापूर- 2242
सोलापूर मनपा- 657
सातारा - 1993
कोल्हापुर-1351
कोल्हापूर मनपा- 309
सांगली- 1695
सिंधुदुर्ग- 522
रत्नागिरी-889
औरंगाबाद-711
औरंगाबाद मनपा-388
जालना- 680
हिंगोली- 262
परभणी - 509
परभणी मनपा-129
लातूर - 676
लातूर मनपा- 193
उस्मानाबाद- 646
बीड -1,314
नांदेड मनपा-155
नांदेड-398
अकोला - 363
अमरावती मनपा-153
अमरावती 844
यवतमाळ-804
बुलढााणा- 1506
वाशिम - 492
नागपूर- 1958
नागपूर मनपा- 2526
वर्धा- 851
भंडारा-747
गोंदिया-355
चंद्रपुर-760
चंद्रपूर मनपा-244
गडचिरोली-475
हेही वाचा -मुंबईत दररोज ५० हजारापेक्षा जास्त परप्रांतीय मजूर होत आहेत दाखल