महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 25, 2021, 5:34 PM IST

ETV Bharat / city

मध्य रेल्वेच्या घाट मार्गातील ८०० दरडी हटविणार; घाट रेल्वे मार्गाचे ७० टक्के काम पूर्ण

पावसाळ्यात लोणावळा ते कर्जत या मध्य रेल्वेच्या हद्दीत अनेकदा दरड कोसळण्याच्या घटना घडतात. यात रुळावर आलेल्या मोठमोठ्या दगडांमुळे मेल-एक्स्प्रेस गाड्यांची वाहतुक विस्कळित हाेते. पावसाळ्यात घाटातील वाहतुकीचे तीनतेरा वाजू नयेत यासाठी मध्य रेल्वेचे घाटातील पावसाळापूर्व कामांवर विशेष लक्ष दिले आहे.

मध्य रेल्वे
मध्य रेल्वेचे काम सुरू असतानाचे छायाचित्र

मुंबई - पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या पुणे-मुंबई मार्गावर लोणावळा ते कर्जत या घाटमार्गावर रेल्वेला विविध अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात लोणावळा ते कर्जत या मध्य रेल्वेच्या हद्दीत अनेकदा दरड कोसळण्याच्या घटना घडतात. यात रुळावर आलेल्या मोठमोठ्या दगडांमुळे मेल-एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक विस्कळित हाेते. पावसाळ्यात घाटातील वाहतुकीचे तीनतेरा वाजू नयेत यासाठी मध्य रेल्वेचे घाटातील पावसाळापूर्व कामांवर विशेष लक्ष दिले आहे. मध्य रेल्वेने आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण केले असून ३१ मे पर्यंत उर्वरित कामे पूर्ण होणार आहेत.

८०० लूज झालेले दरडी पाडणार-
मध्य रेल्वेचे सर्वाधिक कठीण काम घाट भागात सुरू असते. बोर घाटाची लांबी २८ किमी असून यामध्ये सुमारे ५८ बोगदे आहेत. तर, थळ घाटाची लांबी १४ किमी असून सुमारे १८ बोगदे आहेत. यामधील कमकुवत दरडाचे निरीक्षण करून झाले आहे. त्यानुसार घाटमाथ्यावरुन खाली रुळांवर काेसळण्याची शक्यता असलेल्या ८०० लूज झालेल्या दरड पावसाळ्यापूर्वी काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ५५० पेक्षा जास्त दरड सुरक्षित काढण्यात आले आहेत. तसेच उर्वरित दरड काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

५८ बोगद्यांची तपासणी-
मध्य रेल्वे मार्गावर दाेन घाट मार्ग २८ किलाेमीटरचे असून त्यात ५८ बाेगदे आहेत. त्यापैकी ५२ बाेगद्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच क्रमांक ४१, ३८ आणि २९ बोगद्यांचे काम सुरू आहे. या भागात पावसाळ्यात रेल्वे मार्गाच्या देखरेखीसाठी ७४ कर्मचाऱ्यांची २४ तास नियुक्ती करण्यात येणार आहे. कसारा ते इगतपुरी म्हणजेच उत्तर पूर्व घाट हा १४ किलाेमीटरचा आहे. यातील २८ बाेगद्यांपैकी १८ बोगद्यांची तपासणी सुरू आहे. याशिवाय मध्य रेल्वेने पावसाळ्यात पाण्यासाेबत रुळांवर कचरा येऊ नये, याकरिता रेल्वे परिसर स्वच्छ करण्यावर भर दिला आहे.

कामाला मार्च महिन्यापासून सुरुवात -
घाट भागातील मान्सूनपूर्ण कामाची तयारी डिसेंबर २०२०मध्ये झाली. त्यानंतर कामाचा अंदाज, निविदा प्रक्रिया पूर्ण करणे अशी कामे करण्यात आली. प्रत्यक्षात कामाला मार्च २०२१ मध्ये सुरू झाली. बोर घाट, थळ घाट या घाट भागातील कमकुवत दरड ओळखून सुरुंग लावून फोडणे. घाट भागात लोखंडी जाळ्या बसविणे, लहान-मोठ्या दरडची वाहतूक करण्यासाठी ट्रेन चालविणे, अशी कामे घाट भागात सुरू आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

आधुनिक केनेडी फेंसिंग-
घाटमार्गावरील रेल्वे मार्ग दरडीपासून सुरक्षित राहावे, याकरता मध्य रेल्वेने मुंबई-पुणे मार्गावरील लोणावळा ते कर्जत दरम्यान पावसाळ्यापूर्वी विदेश तंत्रज्ञानाप्रमाणे केनेडी फेसिंग जाळी बसवलीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यावर्षी सुद्धा मध्य रेल्वेने घाटमार्गावर मोठ्या प्रमाणात तयारी केली होती, ज्यात दरड कोसळून नये यासाठी आधुनिक पद्धतीने परदेशाप्रमाणे केनेडी फेसिंग जाळी बसविण्याचे काम सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details