मुंबई -दहिसर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. हे तीन दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकले. दरोडेखोरी होण्यापूर्वीच दहिसरच्या शोध पथकाने शहानिशा करत 5 आरोपींपैकी तिघांना ताब्यात घेतले. यातील दोघे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत.
दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या तीन दरोडेखोरांना अटक; दोघे फरार - दहिसर पोलीस
दहिसर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. हे तीन दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकले. दरोडेखोरी होण्यापूर्वीच दहिसरच्या शोध पथकाने शहानिशा करत 5 आरोपींपैकी तिघांना ताब्यात घेतले. यातील दोघे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत.
12 डिसेंबरला पोलीस गस्तीवर असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली. यानुसार पेट्रोलीन पथक दरोडेखोरांच्या मागावर निघाले. मात्र अंधाराचा फायदा घेऊन पाच जणांमधील दोघे फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.
फारूख अक्रम शेख, रविंद्र ठाकूर आणि विकी दुबौडा असे अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. त्यांच्याकडून कोयता, चॉपर, मिर्ची पावडर, लोखंडी रॉड जप्त करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींनी यापूर्वीही मुंबईच्या विविध भागात चोरी, दरोडा, हत्याकांड अशा अनेक गुन्ह्यांत अटक झाली होती.