नवी मुंबई -कोरोना काळात कित्येक कुटूंब आर्थिक संकटात सापडली आहेत. त्यामुळे कित्येक जण आपले जीवन संपवण्यासाठी प्रवृत्त होत आहेत. अशीच घटना नवी मुंबईच्या वाशीमधील सेक्टर 6 परिसरात घडली आहे. येथे एकाच कुटूंबातील तिघांनी आत्महत्या केली असून ही आत्महत्या त्यांनी आर्थिक नैराश्यातून केल्याची माहिती समोर आली आहे. त्या संदर्भात त्यांनी एक चिठ्ठीही लिहिली होती. मोहिनी कामवानी (८७), मुलगा दिलीप कामवानी (६७), मुलगी कांता कामवानी (६३), असे आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहे.
उंदीर मारायचे औषध घेऊन आत्महत्या -