मुंबई - ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या बोरिवलीतील ३ अपहरणकर्त्यांना मुंबई समता नगर पोलिसांनी अटक ( Samta nagar Police Arrested Accused in extortion case ) केली आहे, खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी अपहरणकर्त्याने ( Mumbai Businessman Extortion Case ) दिली होती. खेरवाडी येथून फॉर्च्युनर कारमध्ये बसलेल्या ड्रायव्हर आणि मालकाचे अपहरण करून आरोपींनी कांदिवली ठाकूर गावात सुक्या खाद्यपदार्थाच्या व्यापाऱ्याला आणले होते. अवघ्या 10 तासांत समता नगर पोलिसांनी बोरिवली परिसरातून आरोपीला अटक करून त्याच्यापासून फॉर्च्युनर कार, चालक आणि मालकाला वाचवले.
- अपहरण करुन 50 लाख खंडणीची केली मागणी -
अपहरणाची ही घटना २६ जानेवारी रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास घडली. तेव्हा व्यापारी धवल रमेश अकबरी (३३) यांनी समता नगर पोलिसांना सांगितले की, वांद्रे खेरवाडी परिसरातून फॉर्च्युनर कारमध्ये बसलेल्या चालकासह काही लोकांनी आपले अपहरण केले. जिथे त्याने त्याच्याकडे ५०लाखांची मागणी केली. खंडणी न दिल्यास चालकाला जीवे मारण्याची धमकी दिली. एवढी मोठी रक्कम देण्यास व्यावसायिकाने नकार दिल्याने अपहरणकर्त्याने खंडणीची रक्कम ५लाख ठरवली. पैशांचा तगादा लावण्यासाठी अपहरणकर्त्यांनी व्यावसायिकाला समता नगर येथील हदाद ठाकूर गावात सोडले. परंतु चालक व गाडी ताब्यात घेतली.
अपहरणकर्त्याच्या तावडीतून व्यापारी बाहेर येताच त्यांनी तत्काळ संपूर्ण माहिती समता नगर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तत्काळ स्कॅन केले. ज्यामध्ये पोलिसांना गाडीचे लोकेशन आणि चालकाचे मोबाईल लोकेशन मिळाले. अपहरणकर्ता वारंवार जागा बदलत होता व व्यावसायिकाला त्याच्या चालकाच्या मोबाईलवरून फोन करून एकटाच पैसे घेऊन येण्याची धमकी देत होता. अपहरणकर्त्याने आधी पैसे घेऊन शताब्दी रुग्णालयात बोलावले. आरोपी पोलिसांसोबत आल्याचे समजताच अपहरणकर्त्याने धमकी देत पोलिसांना आणू नका अन्यथा चालकाला मारून टाकू, असे सांगून पोलिसांनी बोरिवलीतील राजेंद्र नगर परिसरातून तीन अपहरणकर्त्यांना अटक केली. ड्रायव्हर आणि फॉर्च्युनर कारचे मोबाईल लोकेशन आणि ड्रायव्हरला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले. कृष्णा बाळाप्पा सैदापूर उर्फ पम्प्या (२३) समीर मोहम्मद मौलाना शेख (२४) आणि देवराज गणेश पवार उर्फ बाबू (२५) असे अशी त्यांची नावे आहेत.
- 5 फेब्रुवारीपर्यंत कोठडी -
पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेले आरोपी हे वाशी डॉय फ्रूट मार्केटमधील व्यापारी धवल यांना ओळखतात. त्यांच्यात पैशांचा व्यवहार झाला. बदला घेण्यासाठी त्यांचे अपहरण करून ५० लाखांची मागणी केली. सर्व आरोपी बोरिवली राजेंद्र नगर येथील रहिवासी असून पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा -चालक लघुशंका करताना अल्पवयीन चोराने पळवली कार; २४ तासात आरोपी ताब्यात