महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Thackeray vs Thackeray ठाकरे विरुद्ध ठाकरे! गणपतीनंतर पुढची लढाई रस्त्यावर, वाचा खास रिपोर्ट - राज ठाकरे यांचा दौरा

शिवसेनेत बंड झाल्यामुळे सध्या आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा काढत आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपण महाप्रबोधन यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले. उद्धव ठाकरे यांची ही यात्रा गणपती नंतर सुरू होणार आहे. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी आपल्या दौऱ्याची घोषणा केली आहे. Thackeray vs Thackeray राज ठाकरे यांचा दौरासुद्धा गणपतीनंतरच सुरू होत आहे. राज विरुद्ध उद्धव हा वाद महाराष्ट्रासाठी काही नावा नाही. त्यात दोन भाऊ एकत्र येण्याचे चर्चा सुरू असतानाच आता या दोन भावांची पुढची लढाई गणपती नंतर रस्त्यावर पाहायला मिळणार आहे. यावर ईटीव्ही भारतचा हा खास रिपोर्ट.

ठाकरे विरुद्ध ठाकरे
ठाकरे विरुद्ध ठाकरे

By

Published : Aug 25, 2022, 10:07 PM IST

मुंबई -पक्षातील बंडामुळे आता माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह टिकवण्यासाठी मोठ्या संघर्ष करण्याची वेळ आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेला पक्ष त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्या हातातून निसटतो की काय अशी सध्याची परिस्थिती महाराष्ट्रात आहे. त्यामुळे जनतेला आपल्या पक्षासोबत जोडून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे मागील महिनाभर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. Whose Shiv Sena? आपल्या निष्ठा यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे जनतेला भावनिक आवाहन करत बंडखोर आमदारांना थेट आव्हान देत आहेत.

निष्ठा नंतर महाप्रबोधन यात्राआदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सध्या शेवटच्या टप्यात आहे. मात्र, आता थोड्याच दिवसात गणपती येतील सर्वत्र गणपतीची धामधूम असेल. त्यामुळे, गणपती नंतर उद्धव ठाकरे त्यांच्या महाप्रबोधन यात्रेला सुरुवात करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत घोषणा केली होती. या यात्रेत उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतील व या सर्व बंडखोर आमदारांना थेट आव्हान देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले होते.

राज ठाकरे देखील दौऱ्यावरराज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आपली काम तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवा. निवडणुका तोंडावर आहेत. आपण काय काम केली ती लोकांना सांगा. आपल्या पक्षाचा उद्देश लोकांना पटवून द्या. तुम्ही प्रयत्न करा. आता गणपती येतायत साधारण नऊ तारखेला अनंत चतुर्थी आहे. नऊ तारखे नंतर मी देखील संपूर्ण राज्याच्या दौऱ्यासाठी बाहेर पडणार आहे. तेव्हा पुन्हा आपली भेट होईलच पण त्याआधी तुम्ही कामाला लागा.

कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आदेशहिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर सुमारे तीन महिन्यांनंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आगामी नागरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकारणाच्या मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलवत कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून तुफान फटकेबाजी करत आगामी काळात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार राहण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.


ठाकरे विरुष ठाकरे पुढची लढाई रस्त्यावरतर आतापर्यंत आपण पाहिल दोघांच्याही दौऱ्याची पार्श्वभूमी. पण, काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी साद आली तर प्रतिसाद देऊ अशी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे दोन बंधू पुन्हा एकदा एकत्र येतील अशा चर्चांना उधाण आलं. मात्र, राज ठाकरे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केलेल्या भाषणामुळे त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. दरम्यान, आतापर्यंत हे दोन्ही बंधू आपल्या भाषणांमधून एकमेकांवर टीका करत होते. पण, गणपतीनंतर दोन्ही ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी दौऱ्यावर निघणार असल्याने आता ठाकरे विरुद्ध ठाकरे ही लढाई आगामी काळात रस्त्यावर देखील पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा -Shinde vs Thackeray होय मी विकासाचे कंत्राट घेतलंय, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार पलटवार

ABOUT THE AUTHOR

...view details