महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पदवी प्रवेशाची उद्या तिसरी गुणवत्ता यादी; विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण - mumbai

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बारावीचा निकालामध्ये गुणवतांची संख्या अधिक आहे. त्यातचही ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशाला पहिल्या गुणवत्ता यादीपासून चुरस पाहायला मिळत आहे. दुसर्‍या यादीनंतर अनेक नामांकित महाविद्यालयांमधील बहुतांश जागा भरल्या आहेत. दुसर्‍या यादीतील विद्यार्थ्यांना काही कारणास्तव प्रवेश रद्द केल्यास वा तो न घेतल्यास अगदी काही मोजक्या जागांसाठी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

degree
college

By

Published : Aug 29, 2021, 10:30 PM IST

मुंबई -मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयामधील अभ्यासक्रमाचा प्रवेशाची पहिली आणि दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आता सोमवारी तिसरी यादी उद्या जाहीर होणार आहे. पहिला आणि दुसर्‍या गुणवत्ता यादीत नामांकित महाविद्यालयांच्या जागा भरल्यामुळे तिसर्‍या यादीत विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

तिसर्‍या गुणवत्ता यादीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बारावीचा निकालामध्ये गुणवतांची संख्या अधिक आहे. त्यातचही ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशाला पहिल्या गुणवत्ता यादीपासून चुरस पाहायला मिळत आहे. दुसर्‍या यादीनंतर अनेक नामांकित महाविद्यालयांमधील बहुतांश जागा भरल्या आहेत. दुसर्‍या यादीतील विद्यार्थ्यांना काही कारणास्तव प्रवेश रद्द केल्यास वा तो न घेतल्यास अगदी काही मोजक्या जागांसाठी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले नसेल, अशा विद्यार्थ्यांनी सध्या जेथे प्रवेश मिळाला तेथे प्रवेश घेऊन ठेवावा यानंतर तिसर्‍या गुणवत्ता यादीसाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला जागणकारांकडून देण्यात येत आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या दुसर्‍या गुणवत्ता यादीत अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने नामांकित महाविद्यालयांमधील जागा भरल्या आहेत. त्यामुळे तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होण्याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.

सीईटी परीक्षा न झाल्याचा फटका
यंदा इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी आवश्यक असलेली सीईटी परीक्षा अद्यापही न झाली नाही. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी बीएसस्सीसाठी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे जेव्हा सीईटी परीक्षा होऊन त्यांची प्रवेश प्रक्रिया पार पडले त्यावेळी या जागा रिक्त होऊन विद्यार्थ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निराश न होता काही काळ प्रतीक्षा करावी इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी कॉलेज बदलू शकतात असा सल्लाही काही प्राचार्यांकडून देण्यात येत आहे.

हेही वाचा -आता सीबीआयने अनिल देशमुखांबाबत आलेल्या बातम्या अन् व्हायरल रिपोर्टबाबत खुलासा करावा - नवाब मलिक

ABOUT THE AUTHOR

...view details