महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी शिवसेनेकडून यशवंत जाधवांना तिसऱ्यांदा संधी - BMC election

पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी सत्ताधारी शिवसेनेकडून यशवंत जाधव यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून अध्यक्ष पदासाठी मकरंद नार्वेकर यांनी आणि काँग्रेसकडून आसिफ झकेरीया यांनी अर्ज भरला.

उमेदवारी अर्ज दाखल
उमेदवारी अर्ज दाखल

By

Published : Sep 30, 2020, 10:01 PM IST

मुंबई - महापालिकेच्या तिजोरीची चावी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी सत्ताधारी शिवसेनेकडून यशवंत जाधव यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. यशवंत जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपकडून अध्यक्ष पदासाठी मकरंद नार्वेकर यांनी आणि काँग्रेसकडून आसिफ झकेरीया यांनी अर्ज भरला. स्थायी समितीमधील संख्याबळ पाहता शिवसेनेचे यशवंत जाधव हे तिसऱ्यांदा स्थायी समिती अध्यक्ष होणार आहेत.

मुंबई महापालिकेचे कामकाज सभागृह, वैधानीक, विशेष व प्रभाग समितीच्या माध्यमातून चालते. पालिकेच्या वैधानिक, विशेष व प्रभाग समितीच्या निवडणूका दरवर्षी एप्रिल महिन्यात संपन्न होतात. मात्र यावर्षी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने निवडणूका घेण्यास राज्य सरकारने बंदी घातली होती. नुकतीच ही बंदी राज्य सरकारने उठवली असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे निवडणुका व सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार 5 ऑक्टोबरपासून निवडणुकांना सुरुवात होत आहे.

वैधानिक समितीत स्थायी, शिक्षण, सुधार आणि बेस्ट समिती यांचा समावेश आहे. यापैकी स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले. त्यात सत्ताधारी शिवसेनेकडून यशवंत जाधव यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. जाधव यांनी स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी संध्या जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात भाजपाकडून स्थायी समितीसाठी मकरंद नार्वेकर तर शिक्षण समितीसाठी सुरेखा पाटील यांनी अर्ज भरला. काँग्रेसकडून स्थायी समितीसाठी आसिफ झकेरीया यांनी तर शिक्षण समितीसाठी संगीता हंडोरे यांनी अर्ज भरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details