मुंबई - नवाब मलिक माननीय मंत्री आहेत, पण ते जे आरोप करत आहेत, ते खूप घाणेरडे आणि खोटे आरोप आहेत. नवाब मलिक यांनी जो आरोप केला. मी दुबईला गेलो होते, पण सर्व्हिसनंतर मी कधीच दुबईला गेलो नाही, असं समीर वानखेडे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -आर्यन खान प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेची एनसीबी कार्यालयात दोन तासांपासून चौकशी सुरु
कुटुंबासोबत मालदीवला गेलो म्हणून तुरुंगात टाकणार ?
ते मालदीव जाण्याचं बोलत आहेत. मालदीव जाणं हे क्राईम आहे का? मी सरकारची अनुमती घेऊन गेलो आहे. माझ्या मुलांबरोबर मी गेलो होतो. याचा अर्थ माझ्याकडून क्राईम झाला का? मी माझ्या कुटुंबासोबत मालदीवला गेलो म्हणून मला तुरुंगात टाकणार? असा सवालही त्यांनी केला.
नवाब मलिक नेमकं काय म्हणाले ?
मुंबई ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आता एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जाहीर कार्यक्रमात इशारा दिलाय. मावळमध्ये गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. त्यावेळी बोलताना समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार, असे खुलं आव्हान देतो. वर्षभरात तुझी नोकरी जाईल, तुझा तुरुंगवास निश्चित आहे, असं वक्तव्य मलिक यांनी जाहीर कार्यक्रमात केलंय. राज्यातील जनता पाहतेय. वानखेडेची बोगसगिरी समोर जनतेसमोर आणणार. त्याचा बाप बोगस होता, हा बोगस आहे, याच्या घरातील सगळे बोगस आहेत. माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करतो की यात माझं काही नाही. माझ्यावर दबाव होता. मग तुझ्यावर दबाव टाकणाऱ्या बापाचं नाव सांग. कोणत्या बापाच्या सांगण्यावरुन हे करतोय ? तुझा बाप कोण याचं उत्तर दे. तुझ्या बापाला मी घाबरत नाही. तुला तुरुंगात टाकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही’, असा घणाघात मलिक यांनी केला आहे.
हेही वाचा -मालदीवमधील वसूलीनंतर रिया चक्रवर्तीला अटक - मंत्री नवाब मलिक