मुंबई - मुंबई महापालिकेत ( Mumbai Municipal Corporation ) भ्रष्टाचाराची गंगोत्री वाहते आहे. याला भाजपाने आक्षेप ( BJP Polkhol Abhiyan Mumbai ) घेतला. आता ही भ्रष्टाचाराची गंगोत्री साफ करण्याचा जबाबदारी भाजपाने स्वीकारली आहे अशी माहिती पालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली. राणीबागेत जी कंत्राटे दिली जातात त्यात भ्रष्टाचार असतो हे आज पुराव्यानिशी उघड ( BJP Corporator Ranibaug Visit ) झाले, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
भ्रष्टाचाराची गंगोत्री -भाजपाने पोलखोल अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत आज भाजपाच्या माजी नगरसेवकांनी राणीबागेला भेट दिली. त्यानंतर प्रभाकर शिंदे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना, राणीबागेत प्राण्यांसाठी पिंजरे उभारले जात आहेत. यासाठी काढण्यात आलेल्या टेंडरला आम्ही आक्षेप घेतला होता. हे टेंडर पास झाले असते तर पालिकेला आर्थिक भुर्दंड बसला असता असे पालिका आयुक्तांनी म्हटले आहे. याचाच अर्थ राणीच्या बागेत जी कंत्राटे दिली जातात त्यात भ्रष्टाचार असतो हे आज पुराव्यानिशी उघड झाले. भाजपाने राणीबागेतील कंत्राटांवर अनेकवेळा आक्षेप घेतले होते. १८५ कोटींचे टेंडर होते, त्यात नंतर १०६ कोटींनी वाढवले. त्याचवेळी हे फुगवलेले अंदाज पत्रक आहे असा आक्षेप घेतला होता. हे अंदाजपत्रक रद्द करण्याची मागणीही आम्ही केली होती. मात्र त्या वेळेला सत्ताधारी शिवसेनेने हे कसे बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. या विरोधात विनोद मिश्रा यांनी अनेक पत्र लिहिली होती. त्याला उत्तरे देण्यात आली आहेत. त्यात कंत्राट रद्द करण्यात आल्याचे म्हटले आहे. पालिकेत भ्रष्टाचाराची गंगोत्री वाहते आहे. याला भाजपाने आक्षेप घेतला. आता ही भ्रष्टाचाराची गंगोत्री साफ करण्याचा जबाबदारी भाजपाने घेतली आहे.