महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'जाहीर केलेली मदत राज्य सरकारने शेतकरी, व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवावी' - विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

"आम्ही घोषणा करणार नाही, मदत जाहीर करू" असं म्हणणारे मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केले. त्यामुळे ही मदत योग्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. तौक्ते आणि निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या 60 टक्के नागरिकांपर्यंत अद्याप राज्य सरकारची मदत पोहोचलेली नाही.

प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर

By

Published : Aug 4, 2021, 6:37 AM IST

Updated : Aug 4, 2021, 7:44 AM IST

मुंबई -राज्यात पुराचा तडाखा सहा जिल्ह्यांना बसला आहे. पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मदत म्हणून राज्य सरकारकडून मंगळवारी 11 हजार 500 कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. मात्र, जाहीर केलेली मदत ही राज्य सरकारने शेतकरी आणि व्यापार्‍यांपर्यंत पोहोचवावी. नाहीतर, कॉन्ट्रॅक्टरपर्यंत ही मदत पोहोचेल, असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला लगावला. तसेच जाहीर केलेली मदत ही पुरेशी नसून यापेक्षाही अधिक मदत राज्य सरकारने करावी, अशी मागणीही त्यांनी केली. सरकारकडून मदत जाहीर केल्यानंतर ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

शेतकरी व्यापाऱ्यांना पर्यंत पोहोचवावी
"आम्ही घोषणा करणार नाही, मदत जाहीर करू", असं म्हणणारे मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केले. त्यामुळे ही मदत योग्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. तौक्ते आणि निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या 60 टक्के नागरिकांपर्यंत अद्याप राज्य सरकारची मदत पोहोचलेली नाही. जी मदत त्यावेळी जाहीर केली होती, त्यापैकी 50 टक्के मदतीची रक्कम ही कॉन्ट्रॅक्टरकडे गेली, असाही आरोप यावेळी प्रवीण दरेकर यांनी केला. त्यामुळे आता तरी मदत कॉन्ट्रॅक्टरकडे न जाता पूरग्रस्तांना पर्यंत मदत पोहोचेल, याची काळजी राज्य सरकारने घ्यावी असे यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले.
Last Updated : Aug 4, 2021, 7:44 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details