मुंबई -भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून राज्यातील महाविकास आघाडीतील खासदार, आमदार तसेच नेत्यांवर राजकीय सूडबुद्धीतून गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांच्या नेत्यांना अटकपूर्व जामीन देण्यात यावा याकरिता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. याचिका सुनावणी घेण्यास योग्य नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने याचिका ऐकण्यास नकार दिला.
हेही वाचा -Bombay High Court : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीची कोर्टात धाव.. एनआयएचा विरोध
काँग्रेसचे कार्यकर्ते मधू होलमागी, युसूफ पटेल आणि रणजीत दत्ता यांनी विशेष सत्र न्यायालयात अर्ज केला होता. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या खासदार आणि आमदारांना त्रास देण्यासाठी भारतीय जनता पक्ष केंद्र सरकाराच्या मदतीने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा दावा याचिकेत केला होता.