मुंबई- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ची SIT आता फक्त तीन प्रकरणांची चौकशी करणार आहे. एसआयटीने इतर तीन प्रकरणे फेटाळून लावली आहेत. नवाब मलिकांचे जावई समीर खान, आर्यन खान आणि अरमान कोहली यांच्या प्रकरणांची चौकशी करणार आहे. आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणासह (Aryan Khan Cruise Drugs Case) सहा प्रकरणांचा तपास एनसीबीच्या विशेष पथकाकडे (Special Squad of NCB) एसआयटी सोपवण्यात आला होता. परंतु त्यातील फक्त तीनच प्रकरणांचा तपास एसआयटीकडून केला जाणार आहे. अन्य तीन प्रकरणांमध्ये कोणतेही आंतरराष्ट्रीय कनेक्शन आढळलेले नाही, असे एसआयटी मधील सूत्रांनी सांगितले आहे.
तीन प्रकरणे वगळली -
मुंबईजवळील जहाजावर सुरू असलेल्या ड्रग पार्टीवर एनसीबीने (Bureau of Narcotics Control) छापा टाकला होता. या कारवाईत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केली. याशिवाय अनेकांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. या कारवाईनंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे राजकीय पक्षांच्या निशाण्यावर आले होते. राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी वानखेडेंवर अनेक हल्ले केले होते, त्यानंतर वानखेडे यांना ड्रग्ज प्रकरणातील खटल्यातून हटवण्यात आले होते. एनसीबीच्या विशेष तपास पथकाने एसआयटी आता तीन प्रकरणे वगळली आहेत.