मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांचे मुख्य सचिवांना पत्र पाठविण्यात आले आहे. ३ दिवसात मंजूर झालेल्या जीआरची माहिती पाठवावी. २८ जून २०२२ शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बंडखोरीमुळे राज्यात राजकीय उलथापालथ होत असताना, मागील काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणामध्ये शासन आदेश ( जीआर ) काढण्याचा सपाटा सुरू झालेला आहे. या संदर्भामध्ये आता खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हस्तक्षेप करत २२,२३ व २४ जून या तीन दिवसांमध्ये किती शासन निर्णय काढण्यात आले आहे. त्याची माहिती पाठविण्यात यावी, अशा आशयाचे पत्र मुख्य सचिवांना पाठवलं आहे.
प्रवीण दरेकर यांनी केली होती मागणी - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मागील आठवड्यात विधानपरिषद विरोधी पक्ष नेते व भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात अंदाधुंद परिस्थिती निर्माण झाली आहे. चुकीच्या पद्धतीने शासकीय आदेश काढण्याचा सपाटा राबविला जात असून त्यावर राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी राज्यपालांना केली होती. तसे पत्र त्यांनी राज्यपालांना लिहिले होते.
काय म्हटले होते पत्रात? - राज्यातील राजकीय स्थिती अत्यंत अस्थिरतेची गेल्या तीन दिवसात बनली आहे. शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने आणि तदनंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मनीषा जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थान सुद्धा त्यांनी रिक्त केल्याचे माध्यमातून समजत आहे. अशात राज्य सरकारतर्फे अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश (जीआर) काढून निर्णय सपाटा राबविला जात आहे. कधी नव्हे इतके महाविकास आघाडीचे सरकार निर्णय घ्यायला लागले आहेत. आज माध्यमांमध्ये या संदर्भातील विस्तृत वृत्त सुद्धा प्रकाशित झाले आहे. १६० च्या व शासन आदेश ४८ तासात जारी करण्यात आले आहेत. विकास प्रकल्पाच्या नावाखाली होत असलेला प्रकार संशय वाढविणारा आहे. पोलीस दल व महत्त्वाच्या विभागातील बदल यांच्या सुद्धा घाट घातला जात आहे. आपण तातडीने यामध्ये हस्तक्षेप करावा आणि या प्रकाराला पायबंद लावावा ही आपल्याला नम्र विनंती आहे.
राज्यपाल पुन्हा सक्रिय? - राज्यपालांना मागील आठवड्यात कोरोनाची लागण झाल्या कारणाने ते चार दिवस खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. २ दिवसापूर्वी ते रुग्णालयातून राजभवनला परतले असून, कामकाजात पूर्ण सक्रिय झाले आहे. राज्यपालांनी आता तीन दिवसात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाची माहिती मागून त्याची शहानिशा करण्यासाठी राज्यपाल सक्रिय झाले आहेत. एकंदरीत राज्यपालांच्या या निर्णयाने महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी अजून वाढणारी आहे.
हेही वाचा-Maharashtra Political Crisis : 29 जूनला भाजप आमदारांना मुंबईत येण्याच्या सूचना, सत्तास्थापनेच्या हालचाली?
हेही वाचा-राजकीय परिस्थिती अस्थिर, राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, दरेकरांची राज्यपालांना पत्राद्वारे विनंती