महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आयकर विभागाकडू सोनू सूदच्या घराची तब्बल 20 तास झाडाझडती, मात्र हाती काय लागले याची सर्वत्र चर्चा - Income Tax Department raided Sonu Sud

बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून सोनू सूद याच्या निवासस्थान, कार्यालय आणि हॉटेलवर आयकर विभागाने छापे टाकायला सुरुवात केली होती. त्यापैकी घरातील झाडाझडतीची मोहीम तब्बल 20 तास सुरु होती. यावेळी घरात सोनू सूद, त्याचे कुटुंबीय आणि संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता. आयकर विभागाचे अधिकारी गुरुवारी पहाटे सोनू सूदच्या घरातून बाहेर पडले.

अभिनेता सोनू सूद
अभिनेता सोनू सूद

By

Published : Sep 16, 2021, 8:14 AM IST

Updated : Sep 17, 2021, 2:43 PM IST

मुंबई - आयकर विभागाने बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून सोनू सूद याच्या निवासस्थान, कार्यालय आणि हॉटेलवर छापे टाकायला सुरुवात केली होती. त्यापैकी घरातील झाडाझडतीची मोहीम तब्बल 20 तास सुरु होती. यावेळी घरात सोनू सूद, त्याचे कुटुंबीय आणि संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता. आयकर विभागाचे अधिकारी गुरुवारी पहाटे सोनू सूदच्या घरातून बाहेर पडले, तेव्हा त्यांच्या हातात काही फाईल्स होत्या. या सगळ्यातून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेमके काय साध्य केले, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाकडून गेल्या दोन दिवसापासून धाडसत्र सुरू आहे. मात्र सोनू सूद यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरचं सोनू सूद केंद्र सरकारच्या रडारवर असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते संजय तटकरे यांनी केला आहे. सोनू सूद यांची वाढती लोकप्रियता, तसेच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असलेला आम आदमी पक्षासोबत सोनू सूद यांची वाढती जवळीकता पाहून केंद्र सरकारने आयकर विभागाला हाताशी धरून या धाडी घातल्या असल्याचा खळबळजनक आरोप संजय तटकरे यांनी केला आहे.

कारवाईबाबत विरोधकांचा दुटप्पीपणा - राम कदम

देशामध्ये जेथे चुकीचं घडत आहे, तिथे तपास यंत्रणा कारवाई करत आहेत. मात्र देशभरातील विरोधी पक्ष दुटप्पी भूमिका घेत असून राज्य सरकारच्या तपास यंत्रणा कारवाई करत असतील तर त्या कारवाया योग्य आहेत, पण केंद्र सरकारच्या तपास यंत्रणेने कारवाई केली तर अयोग्य अशी दुटप्पी भूमिका विरोधी पक्षाची असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी केली आहे.

आयकर विभागाकडू सोनू सूदच्या घराची तब्बल 20 तास झाडाझडती,

दिल्ली सरकारने सोनू सूदला शालेय विद्यार्थ्यांशी संबंधित कार्यक्रमाचे ब्रँड बनवले अ‍ॅम्बेसिडर

एका प्राप्त अहवालानुसार, अकाउंट बुकमध्ये विसंगती असल्याचा आरोप झाल्यानंतर आयटी टीमने सोनू सूद आणि त्याच्या कंपन्यांशी संबंधित 6 ठिकाणी सर्वेक्षण केले. काही दिवसांपूर्वीच दिल्ली सरकारने सोनू सूदला शालेय विद्यार्थ्यांशी संबंधित कार्यक्रमाचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर बनवले आहे. या दरम्यान तो आम आदमी पक्षात सामील होण्याबाबतही बोलले जात होते, पण सोनू सूदने स्वतः सांगितले होते की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी राजकारणावर कोणतीही चर्चा झालेली नाही.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ट्विट

हेही वाचा -अभिनेता सोनू सूदच्या मुंबई येथील कार्यालयाचे आयकर विभागाकडून सर्वेक्षण

Last Updated : Sep 17, 2021, 2:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details