मुंबई -महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता या सत्ता संघर्षातील 16 बंडखोर आमदारांना निलंबित करण्याच्या मागणी विरोधात शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी उपाध्यक्ष यांच्या आदेशाला अहवाल देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होते. या याचिकेवर 20 जुलै रोजी सुनावणी देखील करण्यात आली होती. त्यावेळी या याचिकेवर मोठ्या खंडपीठांसमोर सुनावणी घेण्याची तयारी सरन्यायाधीश यांनी दाखवली होती. त्यानंतर या याचिकेवर 1 ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, आता या याचिकेवर 3 ऑगस्ट रोजी सोनवणे होणार आहे. त्यामुळे, सत्ता संघर्षाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा तारीख पे तारीख सुरू आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही -महाराष्ट्र सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेच्या चिन्हावरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना पक्षावर दोन्ही गट दावा करत आहेत. आता यात नेमका दावा कुणाचा योग्य हे ठरवण्यासाठी आता केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना नोटीस बजावलेली आहे.