मुंबई- कोरोनाचा (Corona) प्रसार रोखण्यासाठी मुंबईमधील पात्र लाभार्थ्यापैकी ९२ लाख ३६ हजार ५०० पात्र नागरिकांना लसीचे दोन्ही डोस (COVID-19 vaccine) द्यायचे आहेत. त्यापैकी आज सायंकाळ पर्यंत ९२ लाख २१ हजार ४५ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. दिलेले लक्ष पूर्ण करण्यासाठी महापालिकेला १५ हजार ४५५ नागरिकांचे लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. यामुळे हे लसीचे उद्दिष्ट मुंबई पालिका (BMC) आज शुक्रवारी (१२ नोव्हेंबर) पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबईकरांना लसीचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट BMC आज पूर्ण करणार - कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस
मुंबईत काल (गुरुवार) सायंकाळपर्यंत एकूण १ कोटी ५१ लाख ३५ हजार २७३ लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. देण्यात आलेल्या एकूण डोस पैकी ९२ लाख २१ हजार ४५ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ५९ लाख १४ हजार २२८ लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत ९९ टक्क्यांहून अधिक लाभार्थ्यांना लसीचा पहिला तर ६३ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
९२ लाख ३६ हजार ५०० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट -
मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण (COVID-19) आढळून आला. तेव्हापासून गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत १८ वर्षावरील पात्र लाभार्थ्यांना लस दिली जात आहे. मुंबईत १ कोटी ३० लाखांहून अधिक नागरिक राहतात. त्यापैकी १८ वर्षांवरील पात्र लाभार्थ्यापैकी ९२ लाख ३६ हजार ५०० पात्र नागरिकांना लसीचे दोन्ही डोस द्यायचे उद्दिष्ट टास्क फोर्स आणि सरकारकडून (Mahavikas Aghadi Government) देण्यात आले आहे.
९२ लाख २१ हजार ४५ लाभार्थ्यांना पहिला डोस -
मुंबईत काल (गुरुवार) सायंकाळपर्यंत एकूण १ कोटी ५१ लाख ३५ हजार २७३ लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. देण्यात आलेल्या एकूण डोस पैकी ९२ लाख २१ हजार ४५ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ५९ लाख १४ हजार २२८ लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत ९९ टक्क्यांहून अधिक लाभार्थ्यांना लसीचा पहिला तर ६३ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. एकूण लसीकरणापैकी १८ ते ४४ वयोगटातील ९१ लाख ४ हजार ३४७, ४५ ते ६० वयोगटातील ३८ लाख ४५ हजार ५६ तर ६० वर्षां वरील २१ लाख ८५ हजार ८७० लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. आजपर्यंत ८८ लाख ३० हजार १५६ पुरुषांना तर ६३ लाख १ हजार ३७९ महिलांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.
असे झाले लसीकरण-
एकूण उद्दिष्ट - ९२ लाख ३६ हजार ५००
एकूण १ कोटी ५१ लाख ३५ हजार २७३ लसीचे डोस
पहिला डोस
९२ लाख २१ हजार ४५ लाभार्थी (९९ टक्क्यांहून अधिक)
दोन्ही डोस
५९ लाख १४ हजार २२८ लाभार्थी (६३ टक्के)
हेही वाचा : Corona Update - राज्यात 997 नवे कोरोनाग्रस्त, 28 रुग्णांचा मृत्यू