महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Governor and Controversy: वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिध्द आहेत राज्यपाल; पाहुया त्यांची विधाने - Lets see their statements

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि वाद यांचे नाते जुनेच आहे. (The governor is known for) वादग्रस्त वक्तव्यासाठी ते प्रसिध्द (his controversial statements) आहेत. यापुर्वीही त्यांनी अशीच वक्तव्य करत वाद वाढवुन घेतले होते. पाहुया त्यांची विधाने (Lets see their statements). गुजराती आणि राजस्थानचे लोक मुंबईतून निघून गेल्यास मुंबईत काय उरेल? असं वादग्रस्त विधान त्यांनी नुकतेच केले ज्या वरुन आज राज्यातील राजकारण तापले आहे.

Governor Bhagat Singh Koshyari
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

By

Published : Jul 30, 2022, 6:42 PM IST

मुंबई:राज्यपाल भगतसिंह कोशारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची कारकिर्दही बऱ्या पैकी वादग्रस्त राहीली आहे. 12 आमदारांच्या नियुक्त्या असोत किंवा वैधानिक विकास मंडळाच्या निवडणुका ते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देणे विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला परवाणगी देणे अशा अनेक कारणामुळे वादात राज्यपाल कायम वादात (his controversial statements) राहिले आहेत. या वादाबरोबर ते कायम विरोधकांच्या रडार वर राहिले आहेत. आणि त्यातुनच त्यांना टीकेची धनी राहिले आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्या नंतरही त्यांना अशाच टीकेला सामोरे जावे लागले आहे. काल त्यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलेल्या विधाना नंतरही त्यांच्यावर विरोधी पक्षासह शिंदे गट (Shinde groups with the opposition) तसेच भाजपनेही त्यांच्या भुमिकेला विरोध दर्शवल्याचे पहायला मिळाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

नेमकं काय म्हणाले राज्यपाल:आपल्या विविध विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या राज्यपालांनी या वेळी थेट मुंबईबाबत मोठे विधान केले आहे. मुंबईत बाहेरून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. काम धंदा, व्यवसाय करण्यासाठी तसेच नाव कमावण्यासाठी अनेक जण स्वप्नाची नगरी मुंबईमध्ये येतात आणि मुंबईत आपली स्वप्ने पूर्ण करतात. म्हणूनच मुंबईला स्वप्नांचे शहर म्हटले जाते. मात्र राज्यपालांनी यावेळी बोलताना, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही, असं थेट विधान त्यांनी केले. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असेही राज्यपाल म्हणाले. त्यांच्या विधानामुळे राजकीय गदारोळ पहायला मिळाला

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

शिवाजी महाराजांबद्दलही वादग्रस्त विधान : औरंगाबादमध्ये 27 फेब्रुवारी रोजी श्री समर्थ साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना ते म्हणाले ‘चाण्याक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालयं. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले, या राज्याची चावी मी तुम्हाला देतो. त्यावर समर्थ म्हणाले, ही राज्याची चावी मला कुठे देता, तुम्हीच याचे ट्रस्टी आहात”, असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केले होते ज्यावर मोठा वाद झाला होता.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

सावित्रीबाईंच्या वयावर आक्षेपार्ह टिप्पणी : 2 मार्च ला पुण्यात कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, कल्पना करा की सावित्रीबाईंचं लग्न 10 वर्षी झालं, तेव्हा त्यांच्या पतीचं वय हे 13 वर्ष होतं. कल्पना करा की लडके-लडकीया, मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील… लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील… एक प्रकारे तो कालखंड मुर्तीच्या पुढे फुले वाहण्याच्या, नतमस्तक होण्याइतकाच नव्हे, तर थोडा इतिहासाचा अभ्यास करण्याचा होता. इतिहासातून शिकण्याचीही संधी आहे, असे वक्तव्य करत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी खळबळ उडवुन दिली होती.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

वादग्रस्त विधानांची जुनी परंपरा : कोश्यारी हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत. तिथल्या राजकारणात ते एक वजनदार नेते म्हणून प्रसिद्ध होते. मात्र, तिथंही त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली होती. कोश्यारी यांनी माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांच्यावर एका सभेत एकेरी भाषेत टीका केली होती. तसंच, बहुगुणा नेमके कोण आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी डीएनए टेस्ट करावी, असं आव्हान त्यांनी दिलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

हेही वाचा : CM Eknath Shinde : भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले....!

ABOUT THE AUTHOR

...view details